England vs West Indies 3rd Test: पहिल्या सामन्यातील पराभवानंतर इंग्लंडनं कसोटी मालिकेत दमदार कमबॅक केले आणि तिसऱ्या सामन्यातही विजयाच्या उंबरठ्यावर आले आहेत. इंग्लंडच्या पहिल्या डावाच्या 369 धावांच्या उत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 197 धावांत गडगडला आणि त्यानंतर इंग्लंडनं 2 बाद 226 धावा करून विंडीजसमोर विजयासाठी 399 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. सामन्याचा चौथा दिवस पावसामुळे वाया गेला आणि इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला त्या विक्रमी विकेटसाठी संपूर्ण एक दिवस प्रतीक्षा पाहावी लागली. ( 500 test wickets for Stuart Broad)
दुसऱ्या डावातही विंडीजचे दोन फलंदाज अवघ्या 10 धावांवर माघारी परतले आहेत. स्टुअर्ट ब्रॉडनं विंडीजच्या पहिल्या डावात 6 विकेट्स घेतल्या. बुधवारी पाचव्या दिवशी त्यानं आणखी एक विकेट घेत नवा विक्रम नावावर केला. ब्रॉडनं एक विकेट्स घेत कसोटीत 500 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या पंक्तित स्थान पटकावलं. शिवाय त्यानं सहकारी गोलंदाज जेम्स अँडरसन याच्यासह ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा आणि शेन वॉर्न यांनी 2000 साली नोंदवलेल्या विक्रमाशी बरोबरी केली. सामन्याच्या पाचव्या दिवशी ब्रॉडनं विंडीजच्या क्रेग ब्रेथवेटला बाद करून हा पराक्रम केला. (500 test wickets for Stuart Broad)
ब्रॉडच्या नावावर 140 सामन्यांत 500 विकेट्स झाल्या आहेत. कसोटीत 500 विकेट्स घेणारा तो 7 वा गोलंदाज ठरला आहे. अँडरसननं या पल्ला आधीच पार केला आहे आणि ब्रॉडच्या या विकेटनंतर एकाच संघातील दोन गोलंदाज हा विक्रम करणारी ही दुसरी जोडी ठरली. यापूर्वी 2000 साली वॉर्न आणि मॅकग्रा यांनी हा पराक्रम केला होता. ( 500 test wickets for Stuart Broad)
कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
- मुथय्या मुरलीधरन ( श्रीलंका) - 133 सामने व 800 विकेट्स
- शेन वॉर्न ( ऑस्ट्रेलिया) - 145 सामने व 708 विकेट्स
- अनिल कुंबळे ( भारत) - 132 सामने व 619 विकेट्स
- जेम्स अँडरसन ( इंग्लंड) - 153 सामने व 589 विकेट्स
- ग्लेन मॅकग्रा ( ऑस्ट्रेलिया) - 124 सामने व 563 विकेट्स
- कर्टनी वॉल्श ( वेस्ट इंडिज) - 132 सामने व 519 विकेट्स
- स्टुअर्ट ब्रॉड ( इंग्लंड ) - 140 सामने व 500 विकेट्स
Web Title: England vs West Indies 3rd Test: 500 test wickets for Stuart Broad, 7 bowlers have taken 500 or more Test wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.