England vs West Indies 3rd Test: पहिल्या सामन्यातील पराभवानंतर इंग्लंडनं कसोटी मालिकेत दमदार कमबॅक केले आणि तिसऱ्या सामन्यातही विजयाच्या उंबरठ्यावर आले आहेत. इंग्लंडच्या पहिल्या डावाच्या 369 धावांच्या उत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 197 धावांत गडगडला आणि त्यानंतर इंग्लंडनं 2 बाद 226 धावा करून विंडीजसमोर विजयासाठी 399 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. दुसऱ्या डावातही विंडीजचे दोन फलंदाज अवघ्या 10 धावांवर माघारी परतले आहेत. स्टुअर्ट ब्रॉडनं विंडीजच्या पहिल्या डावात 6 विकेट्स घेतल्या. आज त्यानं आणखी एक विकेट घेतल्यात नवा विक्रम होणार आहे. ब्रॉडनं एक विकेट्स घेताच त्याच्या आणि सहकारी गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्या नावावर एक वेगळाच विक्रम नोंदवला जाणार आहे. असा विक्रम ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा आणि शेन वॉर्न यांनी 2000 साली नोंदवला होता.
IPL 2020बाबत अमिराती क्रिकेट मंडळाकडून आली मोठी बातमी; आता प्रतीक्षा भारत सरकारच्या निर्णयाची
ब्रॉडच्या नावावर 140 सामन्यांत 499 विकेट्स झाल्या आहेत आणि आज एक विकेट घेताच तो कसोटीत 500 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या पंक्तीत जाऊन बसेल. अशी कामगिरी करणारा तो 7 वा गोलंदाज ठरणार आहे. अँडरसननं या पल्ला आधीच पार केला आहे आणि ब्रॉडच्या एका विकेटनंतर एकाच संघातील दोन गोलंदाज हा विक्रम करणारी ही दुसरी जोडी ठरेल. यापूर्वी 2000 साली वॉर्न आणि मॅकग्रा यांनी हा पराक्रम केला होता.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अँडरसननं एक विक्रम नोंदवला होता. वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला होता. या पंक्तित मॅकग्रा 110 आणि कपिल देव 89 विकेट्ससह आघाडीवर आहेत अँडरसनच्या नावावर 87 विकेट्स आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
ICCची मोठी घोषणा; 30 जुलैपासून सुरू होणार 2023च्या वर्ल्ड कपची पात्रता स्पर्धा
भारताचा माजी कर्णधार करतोय दगड फोडण्याचं काम; Sonu Soodनं पुढं केला मदतीचा हात!
Fact Check : IPL 2020चं वेळापत्रक जाहीर? जाणून घ्या व्हायरल झालेल्या PDFचं सत्य
सौरव गांगुलीचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला; आता पुढे काय?
बीसीसीआयनं माझ्याशी असं वागायला नको होतं; युवराज सिंगनं व्यक्त केली खंत
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या कॅरोलिना मारिनच्या वडिलांचे निधन
विरुष्काची जोडी ठरली लय भारी; दिग्गज फुटबॉलपटू अन् त्याच्या पत्नीवर केली मात
Web Title: England vs West Indies 3rd Test: James Anderson -Stuart Broad will achieve what Shane Warne- Glenn McGrath did in 2000
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.