England vs West Indies 3rd Test: इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडनं वर्चस्व गाजवले. जोस बटलर आणि ऑली पोप यांनी दमदार भागीदारी करताना संघाला पहिल्या दिवसअखेर 4 बाद 258 धावांपर्यंत मजल मारून दिली. विंडीजनं या सामन्यासाठी संघात 140 किलो वजनाचा फिरकीपटू रहकीम कोर्नवॉल याला संधी दिली. विंडीनं पहिली कसोटी जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यात बेन स्टोक्सच्या तुफान खेळीच्या जोरावर इंग्लंडनं विजय मिळवून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. पण, तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात स्टोक्सचा उडालेला त्रिफळा पाहून सर्वांनाच धक्का बसला...
नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. केमार रोचनं पहिल्याच षटकात इंग्लंडचा सलमीवीर डॉम सिब्ली याला बाद केले. कर्णधार जो रूट ( 17) धावबाद आणि बेन स्टोक्स ( 20) यांनाही फार कमाल दाखवता आली नाही. रोरी बर्न्स आणि ऑली पोप यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर बर्न्स माघारी परतला. स्लीमध्ये उभ्या असलेल्या रहकीमनं चपळाईनं त्याचा झेल टिपला. बर्न्स 57 धावा करून माघारी परतला. त्यानंतर पोप आणि बटलर ही जोडी खेळपट्टीवर नांगर रोवून बसली.
दोघांनी दिवसअखेर इंग्लंडचा एकही फलंदाज बाद होऊ दिला नाही. पोप 142 चेंडूंत 11 चौकारांसह 91 धावांवर, तर बटलर 120 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून 56 धावांवर खेळत आहे. पहिल्या दिवशी स्टोक्सची विकेट चर्चेचा विषय ठरली. केमार रोचनं अप्रतिम चेंडू टाकून स्टोक्सचा त्रिफळा उडवला. दुसऱ्या कसोटीत 254 ( 176 +78*) धावा आणि 3 विकेट्स घेणाऱ्या स्टोक्सला 20 धावाच करता आल्या. त्यालाही रोचनं टाकलेल्या चेंडूनं अवाक् केले.
पाहा व्हिडीओ...
Web Title: England vs West Indies 3rd Test: Kemar Roach bowls a jaffa to dismiss Ben Stokes, watch video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.