England vs West Indies 3rd Test : तिसरी कसोटी आहे खास; लाल टोपी घालून मैदानावर उतरणार खेळाडू!

England vs West Indies 3rd Test वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरनं नाणेफेक जिंकून यजमानांना प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 03:46 PM2020-07-24T15:46:20+5:302020-07-24T15:58:09+5:30

whatsapp join usJoin us
England vs West Indies 3rd Test will be named The Ruth Strauss Foundation Test, know why  | England vs West Indies 3rd Test : तिसरी कसोटी आहे खास; लाल टोपी घालून मैदानावर उतरणार खेळाडू!

England vs West Indies 3rd Test : तिसरी कसोटी आहे खास; लाल टोपी घालून मैदानावर उतरणार खेळाडू!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

England vs West Indies 3rd Test : इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा कसोटी सामना आजपासून सुरू होत आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरनं नाणेफेक जिंकून यजमानांना प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले आहे. वेस्ट इंडिजनं पहिली, तर इंग्लंडनं दुसरी कसोटी जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आहे. त्यामुळे मालिका जिंकण्यासाठी तिसरा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा झाला आहे. पण, हा सामना आणखी एका कारणानं खास ठरत आहे. हा सामना 'रुथ स्ट्रॉस फाऊंडेशन' नावानं खेळवण्यात येत आहे आणि त्यामुळे कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचे खेळाडू लाल टोपी घालून मैदानावर उतरणार आहेत. ( first day seeing cricket turn red)

इंग्लंड संघाचा माजी कर्णधार अँड्य्रू स्ट्रॉस याच्या पत्नीला आदरांजली म्हणून हा सामना खेळला जात आहे. त्यामुळे सामन्याचा पहिला दिवस हा 'लाल' रंगाचा असणार आहे. इंग्लंड क्रिकेट मंडळानं त्यांच्या सोशल मीडियावरील DPही लाल रंगाच्या लोगोचा ठेवला आहे. स्ट्रॉसची पत्नी रुथ हिचे दोन वर्षांपूर्वी कॅन्सरनं निधन झालं आणि तिच्या नावानं स्ट्रॉसनं फाऊंडेशन स्थापन केली. रुथ स्ट्रॉस फाऊंडेशन कॅन्सरग्रस्त रुग्णांची मदत करते. त्यामुळे आजच्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचे खेळाडू लाल टोपी घालून फाऊंडेशनला पाठींबा देत आहेत.  ( first day seeing cricket turn red)

या फाऊंडेशनला आर्थिक मदत करण्याचं आवाहन खेळाडूंकडून करण्यात येत आहे. या मदतीतून उभा राहणारा निधी कॅन्सरग्रस्त कुटुंबीयांना दिला जाणार आहे. शिवाय धुम्रपान न करणाऱ्या लोकांच्या फुफ्फुसांत कॅन्सर कसा होतो, याच्या संशोधनासाठी लागणारा निधीही यातून दिला जाणार आहे.  या सामन्यात स्टम्प्सही लाल रंगांचे असणार आहे. शिवाय बाऊंड्री लाईनही लाल लंगाची असेल. यापूर्वी अॅशेस मालिकेतील लॉर्ड्स मैदानावरील सामना रुथ स्ट्रॉस फाऊंडेशनसाठी खेळला गेला होता आणि त्यातून 5 लाख 50 हजाराहून अधिक पाऊंडचा निधी जमा केला गेला होता. ( first day seeing cricket turn red)


 


अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020 रद्द करणं बीसीसीआयला परवडलं नसतं, जाणून घ्या का ? 

'iPhone'ची मोठी घोषणा; आता 'I'चा अर्थ इंडिया, चीनला मोठा धक्का! 

IPL 2020 ची फायनल 8 नोव्हेंबरला; जाणून घ्या भारतीय खेळाडू UAEला कधी होणार रवाना

Breaking : क्रीडा विश्वाकडून चीनला मोठा दणका; सर्व स्पर्धा केल्या रद्द!

Video : प्रत्येक वेळी जिंकणं महत्त्वाचं नसतं; दिव्यांग मुलीची जिद्द पाहून कराल कडक सॅल्यूट!

OMG : IPL 2020 यूएईत होणार असल्यानं मुंबई इंडियन्सची चिंता वाढली!

Web Title: England vs West Indies 3rd Test will be named The Ruth Strauss Foundation Test, know why 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.