ब्रिजटाऊन: इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यातली दुसरी कसोटीही अनिर्णित राहिली आहे. इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या २८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने ५ बाद १३५ धावा केल्या. पहिल्या डावातील शतकवीर कर्णधार क्रेग ब्रेथवेट याने दुसऱ्या डावातही नाबाद ५६ धावा करताना इंग्लंडच्या विजयाच्या आशांना सुरूंग लावला.
वेस्ट इंडीजचा पहिला डाव ४११ धावांवर संपुष्टात आणल्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात १ बाद ५५ धावा करत दुसऱ्या कसोटी सामन्यात १५१ धावांची आघाडी घेतली आहे. अपुऱ्या प्रकाशामुळे चौथ्या दिवसाचा खेळ लवकर थांबविण्यात आला. या सामन्यात एकच दिवस शिल्लक असल्याने ही कसोटी अनिर्णीत अवस्थेकडे झुकली आहे.
वेस्ट इंडीजने ४ बाद २८८ धावांवरून चौथ्या दिवसाचा खेळ सुरू केला. शतकवीर क्रेग ब्रेथवेट (१६०) आणि नाइट वॉचमन म्हणून आलेल्या अल्झारी जोसेफ या जोडीने सुरुवातीच्या अडीच तासांत इंग्लंडला यश मिळू दिले नाही. ही जोडी फोडण्यात बेन स्टोक्सला यश आले. त्याने १९ धावांवर असताना अल्झारी जोसेफला बाद करत वेस्ट इंडीजला पाचवा धक्का दिला. त्यानंतर जेवणानंतरचे सत्र सुरू होताच जेसन होल्डरला बाद करत साकीब मोहम्मदने आपल्या कारकिर्दीतला पहिला बळी घेतला. १२ तास फलंदाजी करत १६० धावांची मॅरेथॉन खेळी करणाऱ्या केग ब्रेथवेटला फिरकीपटू जॅक लिचने तंबूचा रस्ता दाखवला. ब्रेथवेटने आपल्या १६० धावांच्या खेळीत १७ चौकार लगावले. इंग्लंडकडून जॅक लीचने सर्वाधिक तीन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव : १५०.५ षटकांत ९ बाद ५०७ डाव घोषितवेस्ट इंडीज पहिला डाव : १८७.५ षटकांत सर्वबाद ४११ (क्रेग ब्रेथवेट १६०, जेर्मीने ब्लॅकवूड १०२, जॅक लीच ३/११८, साकीब मोहम्मद २/५८.)इंग्लंड दुसरा डाव : १९ षटकांत १ बाद ५५ (झॅक क्राऊली खेळत आहे २८, जो रुट खेळत आहे २, विरास्वामी पॅरमॉल १/१९).