ऑकलंड : न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात आजपासून पहिला कसोटी सामन्याला सुरुवात झाली. डे-नाईट कसोटीमध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी साहेबांचा 10 षटकांत 58 धावांमध्ये खुर्दा उडवला. ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदीने टिच्चून गोलंदाजी करत इंगल्डंच्या फंलजानां 58 धावांत बाद केलं. बोल्टने सहा तर साऊदीने चार फलंदाजांना तंबूचा रास्ता दाखवला.
इंग्लडच्या पाच फंलदाजांना भोपळाही फोडता आला नाही. यामध्ये कर्णधार जो रुट आणि बेन स्टोक सारख्या दिग्गज फंलदाजांचा समावेश आहे. इंग्लंडच्या फक्त दोन फंलदाजांना दोन आकडी धावसंख्या करता आली. बोल्ट आणि साऊदी या न्यूझीलंडच्या वादाळापुढे इंग्लडंच्या तगड्या फंलदाजांनी नांग्या टाकल्या. इंग्लंडकडून मार्क स्टोनमॅन आणि क्रेग ओवरटन यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या ओलांडता आली नाही.
क्रेग ओवरटनने सर्वाधिक नाबाद 33 धावांची खेळी केली. क्रेग ओवरटनने नवव्या स्थानावर फटकेबाजी करत संघाची लाज राखली. क्रेग ओवरटनने 33 धावांची खेळी केली नसती तर इंग्लंडचा संघ 50 धावाही करु शकला नसता. क्रेग ओवरटनने 25 चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 33 धावांची उपयुक्त खेली केली. सलामीवीर मार्क स्टोनमॅनने 20 चेंडूत 10 धावांची खेळी केली. या दोघाशिंवाय अॅलिस्टर कूक 5, डेवीड मलन 2, ख्रिस वॉक्स 5, स्टोक 0, रुट 0 हे मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा न्यूझीलंडने धावांचा पाठलाग करताना एक विकेट गमावत 8 षटकात 8 धावा केल्या आहेत.
न्यूझीलंडचा वरिष्ठ फलंदाज रॉस टेलर याला ऑकलंड येथे ईडन पार्कवर सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी तंदुरुस्त घोषित करण्यात आले. कर्णधार केन विल्यम्सनच्या अनुसार टेलरने कोणत्याही अडचणीशिवाय सराव शिबिरात भाग घेतला होता. इंग्लड संघामध्ये अष्टपैलू बेन स्टोकचा सामवेश करण्यात आला आहे.
Web Title: England were all out on 58 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.