Join us  

इंग्लंडला १८५ धावात गुंडाळले; ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व कायम,१ बाद ६१ अशी मजल

Ashes series : रविवारी पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी यजमान संघाने १ बाद ६१ अशी मजल गाठली असून इंग्लंडच्या तुलनेत हा संघ १२४ धावांनी मागे आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 8:11 AM

Open in App

मेलबोर्न : कर्णधार पॅट कमिन्स आणि फिरकीपटू नाथन लियोन यांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद करीत ॲशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडला अवघ्या १८५ धावांत गुंडाळले. रविवारी पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी यजमान संघाने १ बाद ६१ अशी मजल गाठली असून इंग्लंडच्या तुलनेत हा संघ १२४ धावांनी मागे आहे. 

डेव्हिड वॉर्नरने (३८) आश्वासक सुरुवात करून दिली. तो अखेरच्या क्षणी बाद झाला. जेम्स ॲन्डरसनच्या चेंडूवर जॅक क्राऊली याने त्याचा अगदी जमिनीलगत झेल टिपला. सलामीवीर मार्क्स हॅरिस २० धावांवर नाबाद आहे. नाईट वॉचमन म्हणून आलेल्या लियोनने खाते उघडलेले नाही. त्याआधी कमिन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतले. त्याने ३६ धावात ३, लियोनने ३६ धावात २ आणि मिशेल स्टार्कने ५४ धावात दोन गडी बाद केले. कॅमेरून ग्रीन तसेच पहिली कसोटी खेळणाऱ्या स्कॉट बोलॅन्डने एकेक गडी बाद केला.  

इंग्लंडने सुरुवातीचे तीन फलंदाज ६१ धावांत गमावले. दुसऱ्या सत्रात कर्णधार जो रुट ५० आणि बेन स्टोक्स २५ यांनी धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सत्रात वर्चस्व कायम राखले.  पावसामुळे अर्धा तास विलंबाने खेळ सुरू झाला. हसीब हमीद शून्य, क्राऊली १२, डेव्हिड मलान १४ हे लवकर माघारी परतले. जोस बटलर ३ आणि मार्क वूड ६ हेदेखील अपयशी ठरले. जॉनी बेयरेस्टो याने ३५, तर जॅक लीच (१३) आणि ओली रॉबिन्सन (२२) यांनी तळाला थोडेफार योगदान दिले. 

कर्णधार रूटच्या कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावाफलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला इंग्लिश कर्णधार जो रूट याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध  ७६ चेंडूत अर्धशतक ठोकले. यासोबतच तो कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनला. त्याच्या वर्षभरात १६८० धावा झाल्या.  द. आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ (२००८, १६५६ धावा) दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क (२०१२, १५९५ धावा) तिसऱ्या स्थानावर आहे.

धावफलकइंग्लंड पहिला डाव : हसीब हमीद झे. केरी गो. कमिन्स ००, जॅक क्राऊली झे. ग्रीन गो. कमिन्स १२, डेव्हिड मलान झे. वॉर्नर गो. कमिन्स १४, जो रुट झे. केरी गो. स्टार्क ५०, बेन स्टोक्स झे. लियोन गो. ग्रीन २५, जॉनी बेयरेस्टो झे. ग्रीन गो. स्टार्क ३५, जोस बटलर झे. बोलॅन्ड गो. लियोन ३, मार्क वूड पायचित गो. बोलॅन्ड ६, ओली रॉबिन्सन  झे. बोलॅन्ड गो. लियोन २२, जॅक लीच झे. स्मिथ गो. लियोन १३, जेम्स ॲन्डरसन नाबाद ००, अवांतर : ५, एकूण : ६५.१ षटात सर्वबाद १८५. बाद क्रम:  १-४, २-१३, ३-६१, ४-८२, ५-११५, ६-१२८, ७-१४१, ८-१५९, ९-१७६, १०-१८५.  गोलंदाजी : स्टार्क १५५-३-५४-२, कमिन्स १५-२-३६-३, बोलॅन्ड १३-२-४८-१, ग्रीन ८-४-७-१, लियोन १४.१-३-३६-३. ऑस्ट्रेलिया पहिला डाव : मार्क्स हॅरिस खेळत आहे २०, डेव्हिड वॉर्नर झे. क्राऊली गो. ॲन्डरसन ३८, नाथन लियोन खेळत आहे ००, अवांतर ३, एकूण : १६ षटकात १ बाद ६१. बाद क्रम : १-५७. गोलंदाजी : ॲन्डरसन ५-१-१४-१, रॉबिन्सन ५-०-२३-०, मार्क वूड ४-०-१५-०, बेन स्टोक्स २- 

टॅग्स :इंग्लंडआॅस्ट्रेलिया
Open in App