इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) तारखा जाहीर झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) शुक्रवारी मोठी घोषणा केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची ( आयसीसी) ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून बीसीसीआयनं टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय मालिकेचे आयोजन केलं होतं. पण, आता वर्ल्ड कप स्थगित झाल्यामुळे ही मालिकाही 2021पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय शुक्रवारी बीसीसीआयनं घेतला. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघ मायदेशात इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळणार होता.
बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डानं सामंजस्यानं हा निर्णय घेतला आहे. आता इंग्लंडचा संघ जानेवारी ते मार्च 2021 या कालावधीत भारत दौऱ्यावर येईल आणि भारतीय संघ नंतर कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाईल. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की,''आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर या मालिकेसाठी बीसीसीआय आणि इसीबी यांच्यात चर्चा सुरू होती. जागतील क्रिकेट भारत-इंग्लंड मालिकेची आतुरतेनं वाट पाहत होते. या दोघांमध्ये चुरशीचे सामने रंगतात. ही मालिका 2021पर्यंत पुढे ढकलली गेली आहे.''
पाकिस्तानी सैन्याला सक्षम बनवा, बजेट वाढवा; अख्तर म्हणतो, गवत खाण्याचीही तयारी!
बबिता फोगाटवर कृपादृष्टी का? आशिया स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूची भाजपा सरकारवर टीका
गोरक्षकांच्या दहशतीमुळे मुस्लिमांना जगण्याची भीती वाटतेय; असदुद्दीन ओवेसी भडकले
Electricity Bill : एकनाथ खडसेंना एक लाख रुपयांचं लाईट बिल; नाथाभाऊंचा पारा चढला!
Shocking: तीन महिन्यांत दहा कलाकारांनी केली आत्महत्या; नाव वाचून बसेल धक्का!
Big News : IPL 2020 यूएईत खेळवण्यासाठी सरकारकडून तत्वतः मान्यता; बीसीसीआयची माहिती