ग्रोस आइलेट : महिला टी२० विश्वकप स्पर्धेत दुसऱ्या उपांत्य लढतीत भारताची गाठ २००९ चा चॅम्पियन इंग्लंडविरुद्ध पडेल. इंग्लंडला अखेरच्या साखळी लढतीत वेस्ट इंडिजविरुद्ध ४ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.भारताने साखळी फेरीत चारही सामने जिंकले असून आता भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध गेल्या वर्षी ५० षटकांच्या विश्वकप अंतिम लढतीत पत्कराव्या लागलेल्या पराभवाची परतफेड करण्यास प्रयत्नशील राहील.गत चॅम्पियन वेस्ट इंडिज संघ ‘अ’ गटात ८ गुणांसह अव्वल स्थानी राहिला. त्यांनी अखेरच्या साखळी सामन्यात इंग्लंडचा अखेरच्या षटकात पराभव केला. २२ नोव्हेंबर रोजी पहिल्या उपांत्य लढतीत त्यांची गाठ आॅस्ट्रेलियासोबत पडणार आहे.अखेरच्या साखळी सामन्यात विंडीजने इंग्लंडचा डाव ८ बाद ११५ धावांत रोखला. त्यानंतर तीन चेंडू शिल्लक राखून विजय लक्ष्य गाठले. देवेंद्र डॉटिनने ५२ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. प्रथम गोलंदाजी करताना विंडीजच्या शाकेरा सलमानने झटपट दोन बळी घेतले. इंग्लंडची एकवेळ ६ बाद ५० अशी अवस्था झाली होती, पण सोफिया डंकले (३५) व आन्या श्रबसोले (२९) यांनी ५८ धावांची भागीदारी करीत संघाला शंभर धावांचा पल्ला ओलांडून दिला.आॅसीचा पराभवहरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने साखळी फेरीतील अखेरच्या साखळी लढतीत तीनवेळा टी२० विश्व विजेतेपद पटकावणाºया आॅस्ट्रेलियाचा पराभव केला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- टी२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतापुढे असणार इंग्लंडचे तगडे आव्हान
टी२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतापुढे असणार इंग्लंडचे तगडे आव्हान
महिला टी२० विश्वकप स्पर्धेत दुसऱ्या उपांत्य लढतीत भारताची गाठ २००९ चा चॅम्पियन इंग्लंडविरुद्ध पडेल. इंग्लंडला अखेरच्या साखळी लढतीत वेस्ट इंडिजविरुद्ध ४ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 4:31 AM