इंग्लंडचा आफ्रिकेविरुद्ध मालिका विजय

मोईन अलीच्या शानदार अष्टपैलू खेळाच्या जोरावर इंग्लंडने चौथ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १७७ धावांनी धुव्वा उडवून चार सामन्यांची मालिका ३-१ अशी जिंकली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 02:17 AM2017-08-08T02:17:35+5:302017-08-08T02:17:40+5:30

whatsapp join usJoin us
 England win series against Africa | इंग्लंडचा आफ्रिकेविरुद्ध मालिका विजय

इंग्लंडचा आफ्रिकेविरुद्ध मालिका विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मँचेस्टर : मोईन अलीच्या शानदार अष्टपैलू खेळाच्या जोरावर इंग्लंडने चौथ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १७७ धावांनी धुव्वा उडवून चार सामन्यांची मालिका ३-१ अशी जिंकली. दुसऱ्या डावात नाबाद ७५ धावांची खेळी केल्यानंतर मोईनने आफ्रिकेचा अर्धा संघ बाद करुन इंग्लंडच्या विजयाचे मोलाचे योगदान दिले. इंग्लंडने दिलेल्या ३८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा दुसरा डाव २०२ धावांत गुंडाळला गेला.
पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ३६२ धावा उभारल्यानंतर आफ्रिकेचा डाव २२६ धावांवर संपुष्टात आणून १३६ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. यानंतर कर्णधार जो रुट (४९) आणि मोईन (नाबाद ७५) यांच्या चिवट फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने आफ्रिकेला ३८० धावांचे कठीण आव्हान दिले. मॉर्नी मॉर्केल (४/४१) आणि डुआने आॅलिव्हर (३/३८) यांनी चांगला मारा केला. धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना जखडवून ठेवण्यात इंग्लंडला यश आले. मोइन अलीने हुकमी फलंदाज हाशिम आमला (८३) याचा अडसर दूर केल्यानंतर आफ्रिकेची मधली फळी कापून टाकताना ६९ धावांत ५ बळी घेतले. जेम्स अँडरसननेही १६ धावांत ३ बळी घेत भेदक मारा केला. आफ्रिकेकडून आमलाव्यतिरिक्त कर्णधार फाफ डुप्लेसिस (६१) याने अपयशी झुंज दिली. (वृत्तसंस्था)

संक्षिप्त धावफलक :

इंग्लंड : (पहिला डाव) सर्व बाद ३६२ धावा आणि (दुसरा डाव) : ६९.१ षटकांत सर्व बाद २४३ धावा (मोइन अली ७५*, जो रुट ४९; मॉर्नी मॉर्केल ४/४१; डुआने आॅलिव्हर ३/३८) वि. वि. द. आफ्रिका : (पहिला डाव) सर्व बाद २२६ धावा आणि (दुसरा डाव) सर्व बाद २०२ धावा (हाशिम आमला ८३, डूप्लेसिस ६१; मोईन अली ५/६९, जेम्स अँडरसन ३/१६)

Web Title:  England win series against Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.