विराट कोहली 'कनेक्शन'वर महिला क्रिकेटर झाली ट्रोल 

विराटने अनुष्का शर्माला घटस्फोट द्यावा, असे तुला वाटत आहे का?, असा प्रश्न काही विचारला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 07:10 AM2018-03-27T07:10:40+5:302018-03-27T07:10:40+5:30

whatsapp join usJoin us
England women cricketer got troll by netizens on twitter | विराट कोहली 'कनेक्शन'वर महिला क्रिकेटर झाली ट्रोल 

विराट कोहली 'कनेक्शन'वर महिला क्रिकेटर झाली ट्रोल 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली -  भारतीय महिला क्रिकेट संघाविरुद्ध टी-20 सामन्यात 52 चेंडूत विक्रमी शतक झळकावणारी इंग्लंडची फलंदाज डॅनियल वेट ट्विटरवर नेटीझन्सची शिकार ठरली आहे.  संघातील सहकारी केट क्रॉसनेच याची सुरुवात करून दिली. केटने वेटच्या शतकाशी विराट कोहली कनेक्शन जोडल्यानंतर ट्रोलर्सनीही चांगलीच फिरकी घेतली. 

विराट कोहलीची फॅन असणारी इंग्लंडच्या डॅनियल वेटने रविवारी भारतीय संघाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या सामन्यात 52 चेंडूत धडाकेबाज शतक झळकावले. तिचे कारकीर्दीतील हे सर्वात वेगवान शतक ठरलं होतं. योगायोग म्हणजे विराट कोहलीने वनडेत 20 चेंडूत शतक झळकावलेलं असून एखाद्या भारतीय कर्णधाराने झळकावलेलं ते सर्वात वेगवान शतक आहे. केट क्रॉसने या दोन्ही रेकॉर्ड्सचा उल्लेख करत डॅनियल वेटला टॅग करून, तुझा नशिबावर विश्वास आहे का?, असं प्रश्नार्थक ट्विट केलं आहे. हे ट्विट वेटने रीट्विट केलं असून या ट्विटची ट्रोलर्सनी चांगलीच फिरकी घेतली आहे. 





 

डॅनियल वेटने तीन वर्षांपुर्वी विराट कोहलीला लग्नाची ऑफर दिली होती. त्यामुळे प्रकाशझोतात आलेली वेट आता केटच्या ट्विटमुळे नव्याने चर्चेत आली आहे. विराटने अनुष्का शर्माला घटस्फोट द्यावा, असे तुला वाटत आहे का?, असा प्रश्न काही ट्रोलर्सनी विचारला आहे.


'भाभीजी ये देखिये', असे नमूद करत काहींनी अनुष्काचेही याकडे लक्ष वेधले आहे. 


डॅनियल वेटने 4 एप्रिल 2014 ला एक ट्विट करत लिहिलं होतं की, 'कोहली मॅरी मी'. त्यावेळी हे ट्विट प्रचंड व्हायरल झालं होतं. अनेकांनी तर विराटने डॅनियल वेटचा प्रस्ताव स्विकारला पाहिजे असा सल्लाही दिला होता. आता जेव्हा विराट कोहली आणि अनुष्का शर्माने सात फेरे घेत सात जन्माच्या शपथा घेतल्या, तेव्हा मात्र डॅनियल वेटने पुढील आयुष्यासाठी विराटला शुभेच्छा दिल्या होत्या.  

सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना (४० चेंडू, ७६ धावा) आणि मिताली राज (४३ चेंडू, ५३ धावा) यांच्या चमकदार खेळीच्या जोरावर यजमान संघाने २० षटकांत ४ बाद १९८ धावांची दमदार मजल मारली होती. लक्ष्याचा पाठलाग करताना डॅनियलीने ६४ चेंडूंना सामोरे जाताना १५ चौकार व ५ षटकारांच्या साहाय्याने १२४ धावांची शानदार खेळी करीत पाहुण्या संघाला ८ चेंडू राखून लक्ष्य गाठून दिले.
डॅनियलीने पहिल्याच षटकात तीन चौकार ठोकत आपला निर्धार स्पष्ट केला. तिने ब्रायोनी स्मिथसोबत (१५) सलामीला ६१ धावांची भागीदारी केली. वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने ब्रायोनीला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. इंग्लंडने पॉवरप्लेमध्ये १ बाद ६७ धावांची मजल मारली होती. पॉवर प्लेनंतरही डॅनियलीने आक्रमकता कायम राखत भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. तिने २४ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले तर ५२ चेंडूंमध्ये शतकाला गवसणी घातली.
 

Web Title: England women cricketer got troll by netizens on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.