आॅकलंड : इंग्लंडने कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध निचांकी धावसंख्या नोंदवली. इंग्लंडचा संघ ५८ धावातच तंबूत परतला. त्यानंतर कर्णधार केन विल्यम्सनच्या नाबाद ९१ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या दिवसअखेर ३ बाद १७५ धावांची आघाडी घेतली होती. टेÑंट बोल्टने (६/३२) व टिम साऊदी (४/२५) यांनी इंग्लंडची दाणादाण उडवली.
एकवेळ वाटत होते की इंग्लंडचा आपल्या निचांकी धावसंख्या २६ वर बाद होईल. ही धावसंख्या इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध याच मैदानात नोंदवली होती. नवव्या क्रमांकाचा फलंदाज क्रेग ओव्हरटनने नाबाद ३३ धावा करत संघाला ५८ धावांवर पोहचवले. इंग्लंड संघ सहाव्या क्रमांकाच्या निचांकी धावसंख्येवर बाद झाला आहे.
दुसरीकडे विल्यम्सन १८ व्या कसोटी शतकापासून ९ धावा दूर आहे. न्यूझीलंडकडून सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम रॉस टेलर आणि मार्टिन क्रो यांच्या नावावर त्यांनी प्रत्येकी १७ शतके झळकावली आहेत. विल्यम्सन याने टॉम लॅथमसोबत दुसऱ्या गड्यासाठी ८४ धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत हेन्री निकोल्ससोबत (२४ धावा) खेळत होता. दोघांनी चौथ्या गड्यासाठी ५२ धावांची नाबाद भागीदारी केली. साऊदी याने २५ धावा देत ४ गडी बाद करत बोल्टला चांगली साथ दिली. (वृत्तसंस्था)
ब्रॉडचे ४००
गडी पूर्ण
स्टुअर्ट ब्रॉड हा कसोटी क्रिकेटमध्ये ४०० गडी घेणारा इंग्लंडचा दुसरा गोलंदाज बनला. त्याने न्यूझीलंडच्या टॉम लॅथमला बाद करून हा टप्पा गाठला. ब्रॉडने लॅथमला ख्रिस व्होक्सच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. ११५ व्या कसोटी सामन्यात ब्रॉडने ही कामगिरी केली. ब्रॉडसोबत गोलंदाजी करणारा जेम्स अँडरसन हा इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज असून त्याने १३४ सामन्यात ५२३ गडी बाद केले आहेत.
Web Title: England won by 58 runs, Khurda dominated by Kiwis
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.