लंडन : तेजतर्रार गोलंदाज जेम्स अँडरसनच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीच्या बळावर इंग्लंडने शनिवारी येथे लॉर्डस्वर वेस्ट इंडिजविरुद्ध तिस-या कसोटी सामन्यात ९ गडी राखून विजय नोंदवताना ३ सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली.अँडरसन शुक्रवारी ५०० कसोटी बळी घेणारा इंग्लंडचा पहिला आणि क्रिकेट इतिहासातील सहावा गोलंदाज ठरला होता आणि आज त्याने त्याची शानदार कामगिरी कायम ठेवताना २०.१ षटकांत ४२ धावांत ७ गडी बाद केले. त्याच्या या शानदार कामगिरीच्या बळावर इंग्लंडने वेस्ट इंडिजचा दुसरा डाव तिसºया दिवशी १७७ धावांत गुंडाळला. हेडिंग्लेत २ शतके ठोकून वेस्ट इंडिजला विजय मिळवून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधण्यात निर्णायक भूमिका बजावणाºया शाइ होपने सर्वाधिक ६२ धावा केल्या. सलामीवीर फलंदाज कायरन पॉवेलने ४५ धावा केल्या. या दोघांशिवाय एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. अँडरसनच्या कामगिरीमुळे इंग्लंडला विजयासाठी फक्त १०७ धावांचे लक्ष्य मिळाले आणि त्यांनी हे लक्ष्य २८ षटकांत १ गडी गमावून १०७ धावा करीत पूर्ण केले. मार्क स्टोनमन (नाबाद ४० धावा) आणि टॉम वेस्टले (नाबाद ४४) यांनी दुसºया गड्यासाठी नाबाद ७२ धावांची भागीदारी करताना इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.३५ वर्षीय अँडरसनने याआधी २००८ मध्ये ट्रेंटब्रिजवर न्यूझीलंडविरुद्ध १२९ कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम ४३ धावांत ७ बळी ही कामगिरी मागे टाकली. अँडरसनने लॉर्डस्वर कसोटी डावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याची पाचव्यांदा किमया साधली. इंग्लंडचा महान अष्टपैलू इयान बॉथमने अशी कामगिरी लॉर्डस्वर सर्वात जास्त आठ वेळेस केली आहे. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलकवेस्ट इंडिज (पहिला डाव) १२३. दुसरा डाव : १७७. (शाइ होप ६३, कायरन पॉवेल ४५. जेम्स अँडरसन ७/४२, स्टुअर्ट ब्रॉड २/३५).इंग्लंड (पहिला डाव) : १९४. दुसरा डाव : १ बाद १०७. मार्क स्टोनमन नाबाद ४०, थॉमस वेस्टली नाबाद ४४. देवेंद्र बिशू १/३५).
- Cricket Buzz»
- बातम्या»
- वेस्ट इंडिजविरुद्ध इंग्लंडने मालिका जिंकली, गोलंदाज जेम्स अँडरसनचे ७ बळी
वेस्ट इंडिजविरुद्ध इंग्लंडने मालिका जिंकली, गोलंदाज जेम्स अँडरसनचे ७ बळी
तेजतर्रार गोलंदाज जेम्स अँडरसनच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीच्या बळावर इंग्लंडने शनिवारी येथे लॉर्डस्वर वेस्ट इंडिजविरुद्ध तिस-या कसोटी सामन्यात ९ गडी राखून विजय नोंदवताना ३ सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 3:55 AM