mumbai indians ipl । मुंबई : सध्या आयपीएलच्या (IPL 2023) सोळाव्या हंगामाचा थरार रंगला असून या हंगामाचा निम्मा टप्पा पार पडला आहे. जवळपास सर्वच संघांनी आठ ते नऊ सामने खेळले असून गुणतालिकेत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. आताच्या घडीला १२ गुणांसह गतविजेता गुजरात टायटन्सचा संघ अव्वल स्थानावर आहे. तर स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ अर्थात मुंबई इंडियन्स यंदा संघर्ष करत आहे. संघाची खराब गोलंदाजी पराभवाचे प्रमुख कारण ठरते आहे. जसप्रीत बुमराहच्या (jasprit bumrah) अनुपस्थितीमुळे जोफ्रा आर्चरच्या खांद्यावर वेगवान माऱ्याची धुरा होती. पण आर्चर देखील दुखापतीमुळे केवळ दोन सामने खेळू शकला आहे.
दरम्यान, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डन (Chris Jordan) मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाला आहे. ESPNcricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई इंडियन्सने ख्रिस जॉर्डनला IPL २०२३ मध्ये करारबद्ध केले असून आगामी सामन्यांमध्ये तो खेळण्याची शक्यता आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने सर्वाधिक पाचवेळा आयपीएलचा किताब पटकावला आहे. यंदाच्या हंगामात मुंबईची वाटचाल चढ-उताराची राहिली असून संघाला तीन सामने जिंकण्यात यश आले आहे.
आज RR vs MI वानखेडेवर थरार
आज सायंकाळी मुंबई इंडियन्स आपल्या आठव्या सामन्यात राजस्थान रॉयल्ससोबत भिडणार आहे. वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात मुंबईचा संघ आपल्या कर्णधाराला वाढदिवसादिवशी विजयी भेट देणार का हे पाहण्याजोगे असेल. आज मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा ३६ वाढदिवस असून हिटमॅनने आपला वाढदिवस मुंबई इंडियन्सच्या शिलेदारांसोबत साजरा केला. रोहितच्या वाढदिवशीच मुंबईचा संघ आयपीएलच्या इतिहासातील १००० वा सामना खेळत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: england's fast bowler Chris Jordan has been signed by Mumbai Indians for IPL 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.