मुंबई : इंग्लंडचे माी कर्णधार बॉब विलिस यांचे बुधवारी रात्री निधन झाले, ते ७० वर्षांचे होते. १९७०-८० या दशकामध्ये बॉब यांनी आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर बऱ्याच दिग्गज फलंदाजांना सळो की पळो करून सोडले होते. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर त्यांनी समालोचन केले होते.
बॉब हे इंग्लंडसाठी १९७१ ते १९८४ या कालावधीमध्ये क्रिकेट खेळले. त्यांनी ९० कसोटी सामन्यांमध्ये ३२५ विकेट्स मिळवल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९८१ साली हेडिंग्ले येथे झालेल्या कसोटी सामन्यामध्ये त्यांनी फक्त ४३ धावांत ८ फलंदाजांना बाद केले होते. त्यांनी इंग्लंडसाठी १८ कसोटी आणि २९ एकदिवसीय सामन्यांमध्ये नेतृत्व केले होते. १९८४ साली त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली होती. बॉब यांनी ३०८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २४.९९ च्या सरासरीने ८९९ बळी मिळवले होते.