बांगलादेशविरूद्धच्या मालिकेत (INDW vs BANW) फारशी चांगली कामगिरी करता न आल्याने भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला आयसीसी क्रमवारीत मोठा फटका बसला. हरमनची दोन स्थानांनी घसरण झाली असून इंग्लिश खेळाडूने अव्वल स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू बेथ मूनीला मागे टाकून इंग्लंडच्या सीव्हर ब्रंट हिने पहिल्या स्थानी झेप घेतली. तर, बेथ मूनीची तिसऱ्या स्थानी घसरण झाली असून श्रीलंकेची चमारी अट्टापट्टू दुसऱ्या स्थानावर पोहचली आहे.
इंग्लंडची स्टार फलंदाज सीव्हर ब्रंटने ॲशेस मालिकेत शानदार कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावर तिने आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली. खरं तर सलग दोन सामन्यात शतक झळकावणारी ती दुसरी इंग्लिश खेळाडू ठरली आहे. ३० वर्षीय ब्रंटने ८०३ गुणांसह पहिले स्थान पटकावले, तर चमारी अट्टापट्टू ७५८ गुणांसह दुसऱ्या आणि बेथ मूनी ७५४ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.
हरमनची आठव्या स्थानी घसरण
भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचे ६९४ गुण असून तिची दोन स्थानांनी घसरण झाली आहे. सहाव्या स्थानावर असलेल्या हरमनची आठव्या स्थानी घसरण झाली. बांगलादेशविरूद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत भारतीय कर्णधाराने एकूण ७१ धावा केल्या होत्या. तिसऱ्या सामन्यात अम्पायर्ससोबत वाद घातल्यामुळे तिला दंड देखील आकारण्यात आला. फलंदाजांच्या क्रमवारीत भारताची उप कर्णधार स्मृती मानधना ७०८ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
Web Title: England's Sciver-Brunt tops the ICC Women's ODI Batting Rankings while India captain Harmanpreet Kaur is eighth and Smriti Mandhana is sixth
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.