ब्रिस्बेन : अॅशेज मालिकेत पदार्पणातच शतकाजवळ पोहोचलेल्या इंग्लंडच्या जेम्स विंस याला धावबाद करीत आॅस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीच्या सुरुवातीच्या दिवशी पुनरागमन केले. कर्णधार जो रुट आणि अॅलेस्टर कुक हे दोघे स्वस्तात बाद झाले; परंतु विंस आणि मार्क स्टोनमन यांनी इंग्लंडचा डाव सावरला. पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ निर्धारित वेळी आधी संपला. त्या वेळेस इंग्लंडने ४ बाद १९६ धावा केल्या होत्या. विंस ८३ धावांवर बाद झाला. तो जोश हेजलवूड याच्या चेंडूंवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात नाथन लियोन याच्या थेटफेकीवर धावबाद झाला. त्याआधी लियोनच्या चेंडूंवर यष्टिरक्षक टीम पेन याने विंसला जीवदान दिले होते. त्या वेळेस तो ६८ धावांवर खेळत होता. या जीवदानाचा फायदा घेत विंसने १७० चेंडूंत १२ चौकारांसह ८३ धावा केल्या.
इंग्लंडची सुरुवात खूप खराब झाली आणि तिसºयाच षटकात मिशेल स्टार्कने सलामीवीर अॅलेस्टर कुक याला तंबूत धाडले. त्या वेळेस धावफलकावर अवघ्या २ धावा होत्या. इंग्लंडच्या २०१०-२०११ च्या अॅशेज मालिकेतील ३-१ विजयाचा शिल्पकार राहिलेल्या कुकने त्या वेळेस ७६६ धावा केल्या होत्या; परंतु त्यानंतर तो चांगली कामगिरी करू शकला नाही. कुक परतल्यानंतर विंस आणि स्टोनमन यांनी दुसºया गड्यासाठी १२५ धावांची भागीदारी केली.
सराव सामन्यादरम्यान चार डावांत एक शतक व तीन अर्धशतके झळकावणारा स्टोनमन चहापानाला ५३ धावांवर बाद झाला. दुसरीकडे विंस याने त्याची याआधी कसोटीतील ४२ धावांची सर्वोत्तम खेळी मागे टाकत चांगली खेळी केली.
विंस बाद झाल्यानंतर १५ धावांवर रुटला पॅट कमिन्सने पायचीत केले. पहिल्या दिवशी खेळ संपला तेव्हा डेव्हिड मालान २८ धावांवर खेळत होता आणि मोईन अली याने १३ धावा केल्या.
>धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : ८०.३ षटकांत ४ बाद १९६ धावा
(जेम्स विंस ८३, मार्क स्टोनमन ५३, जो रुट १५, डेव्हिड मालान खेळत आहे १८, मोईन अली खेळत आहे १३. पॅट कमिन्स २/५९, मिशेल स्टार्क १/४५).
Web Title: England's slow start, Vince and Stoneman half-centuries
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.