लंडन : इंग्लंडचा कर्णधार जो रुट याच्या शतकाने शनिवारी येथे भारताविरोधात दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी चहापानापर्यंत पहिल्या डावात पाच बाद ३२८ धावा केल्या आहेत. या मालिकेत दुसरे शतक करणाऱ्या रुट याने १४५ धावा केल्या. आणि मोईन अली हा २१ धावा करून त्याची साथ देत आहे. यजमान संघ हा चहापानापर्यंत पहिल्या डावात भारतापेक्षा फक्त ५० धावांनी मागे आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात ३६४ धावा केल्या होत्या. इंग्लंडने सकाळी तीन बाद ११९ धावांवरून खेळायला सुरुवात केली होती. इंग्लंडचा कर्णधार जो रुट याने पुन्हा एकदा भारतीय जलदगती गोलंदाजीचा सामना चांगल्या पद्धतीने केला. तर जॉनी बेअरस्टो याने अर्धशतक झळकावत त्याला साथ दिली. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीपासून भारताच्या गोलंदाजीवर रुट याने आक्रमण चढवले. बेअरस्टोने २२ वे अर्धशतक पूर्ण केले. त्याने सात चौकारांसह ५७ धावा केल्या. मात्र त्याला सिराज याने बाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर इशांत याने जोश बटलरला त्रिफळाचीत करत संघाला दुसरे यश मिळवून दिले.
राहुलवर फेकली बाटलीचे कॉर्क
भारताच्या पहिल्या डावात शतक करणाऱ्या के.एल. राहुल शनिवारी इंग्लंडविरोधात दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी लंचच्या आधी काही प्रेक्षकांनी के.एल. राहुल याच्यावर स्टॅण्डमधून बाटलीचे कॉर्क फेकले. इंग्लंडच्या डावात ६९ व्या षटकांत तो एक वस्तू घेताना दिसला ती वस्तू शँपेनच्या बाटलीच्या कॉर्कसारखी दिसत होती. त्यानंतर कोहलीने त्याला ते कॉर्क बाहेर फेकण्यास सांगितले. भारतीया खेळाडूंनी नंतर याप्रकरणी मायकेल गॉ व रिचर्ड इलिंगवर्थ यांच्याशी चर्चा केली.
धावफलक :भारत (पहिला डाव) : १२६.१ षटकांत सर्वबाद ३६४ धावा.इंग्लंड (पहिला डाव) : रोरी बर्न्स पायचीत गो. शमी ४९, डॉमनिक सिब्ले झे. राहुल गो. सिराज ११, हसीब हमीद त्रि. गो. सिराज ०, जो रुट खेळत आहे १४५, जॉनी बेयरस्टो झे. कोहली गो. सिराज ५७, जोस बटलर त्रि. गो. इशांत २३, मोइन अली खेळत आहे २१. अवांतर : २२. एकूण : १०५ षटकांत ५ बाद ३२८ धावा.गोलंदाजी : इशांत शर्मा २०-२-६०-१; मोहम्मद शमी २३-३-८९-१; मोहम्मद सिराज २३-४-७१-३