नवी दिल्ली : इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स सध्या लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेनंतर तो विश्रांती घेत आहे. स्टोक्स हा सुट्टीचा आनंद घेत असताना अचानक त्याच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला, ज्यावरून तो चांगलाच संतापला आहे.
दरम्यान, रेल्वे स्टेशनवर एका चोरट्याने स्टोक्सची फसवणूक करून त्याची बॅग चोरून नेली. याबाबत खुद्द बेन स्टोक्सने माहिती दिली आहे. लंडनमधील किंग्ज क्रॉस रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली आहे. या घटनेनंतर स्टोक्स खूप निराश झाला आणि त्याने आपली नाराजी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
बेन स्टोक्सला राग अनावर बेन स्टोक्सने ट्विट करत म्हटले, "ज्याने किंग्स क्रॉस रेल्वे स्टेशनवर माझी बॅग चोरली. मला वाटते की, माझे कपडे तुम्हाला खूप मोठे होतील." हे लिहिण्यासोबतच स्टोक्सने संतप्त इमोजीही टाकला. त्याच्या या ट्विटवर चाहते अनेक प्रतिक्रिया देत आहेत. अनेक चाहते चिंता व्यक्त करत आहेत, तर काहींनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत.
IPLचा पूर्ण हंगाम खेळणार स्टोक्सखरं तर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचे पुढील लक्ष्य इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) आहे. आगामी आयपीएल हंगामात तो महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणार आहे. चेन्नईने त्याला 16.25 कोटी रुपयांना विकत घेतले. तो संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध असेल, असे स्टोक्सने आधीच स्पष्ट केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"