रांची : अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने चौथ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी इंग्लंडला दुसऱ्या डावात १४५ धावांवर रोखले. त्यानंतर विजयासाठी १९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने बिनबाद ४० अशी शानदार सुरुवात करत विजयाकडे वाटचाल केली आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार रोहित शर्मा (२४) आणि यशस्वी जैस्वाल (१६) मैदानावर होते. विजयासाठी भारताला १५२ धावांची गरज असून कसोटीचे दोन दिवस शिल्लक आहेत. अश्विन (५-५१) याने ३५व्यांदा डावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त गडी बाद करण्याची कामगिरी केली. तर कुलदीपने (४-२२) प्रभावी मारा केला, त्यामुळे जॅक काऊली (६०) याच्या शानदार फलंदाजीनंतरही इंग्लंडचा दुसरा डाव १४५ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३५३ धावांच्या प्रत्युत्तरात भारताचा डाव ३०७ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात ४६ धावांची आघाडी मिळाली. ध्रुव जुरेल याच्या झुंजार खेळीमुळे भारताला 300 पर्यंत मजल मारता आली.
बेन इकेट (१५) आणि ओली पोप (०) एकापाठोपाठ बाद झाल्याने इंग्लंडची दुसन्या डावात खराब सुरुवात झाली. जो रूट (११) याला पायचित करत अश्विनने इंग्लंडची तीन बाद ६५ अशी अवस्था केली. जॉनी बेअरस्टो आणि अॅक क्राऊली यांनी चौथ्या गड्यासाठी ४५ धावा जोडताना संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. कुलदीपने काऊलीचा त्रिफळा उडवत इंग्लंडला धक्का दिला, क्राऊलीने ९१ चेंडूंत सात चौकारांसह ६० धावा केल्या. त्यानंतर बेन स्टोक्स (४) याचाही त्रिफळा कुलदीपने उडविला. जॉनी बेअरस्टो (३०), टॉम हार्टले (७), ओली रॉबिन्सन (०), बेन फोक्स (१७) आणि जेम्स अँडरसन (०) यांना बाद करत भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला.याआधी, भारताने सात बाद २१९ वरून पुढे सुरुवात केली, जुरेल याने शानदार फलंदाजी करत कारकिर्दीतील सर्वोत्तम १० धावांची खेळी साकारली. हे त्याचे पहिलेच कसोटी अर्धशतक ठरले. त्याने कुलदीपसोबत ७६ आणि आकाश दीप (९) याच्यासोबत नवव्या गड्यासाठी ४० धावांची भागीदारी केली.
• इंग्लंड (पहिला डाव) २०४.५ षटकांत सर्वबाद ३५३ धावा • भारत (पहिला डाव): यशस्वी जैस्वाल त्रि. गो. बशीर ७३, रोहित शर्मा झे. फोक्स गो. अँडरसन २. शुभमन गिल पायचीत गो. बशीर ३८. रजत पाटीदार पायचीत गो. बशीर १७, रवींद जडेजा हो. पोप गो. बशीर १२, सरफराज खान झे. रुट गो. हार्टली १४, ध्रुव जुरेल त्रि. गो. हार्टली ९०, रविचंदन अश्विन पायचीत गो. हार्टली १. कुलदीप यादव त्रि. गो. अँडरसन २८. आकाश दीप पायचीत गो. बशीर ९, मोहम्मद सिराज नाबाद ०. अवांतर २३, एकूण: १०३.२ षटकांत सर्वबाट ३०७ धावा. बाद क्रम : २-४, २-८६, ३- ११२, ४-१३०, ५-९६१, ६-१७१, ७-१७७, ८-२५३, ९-२१३, १०-३०७, गोलंदाजी : जेम्स अँडरसन १८-४-४८-२. ओली रॉबिन्सन १३-०-५४-०, शोएब बशीर ४४-८-११९-५, टॉम हार्टली २७.२-६-६८-३, जो रुट १-०-१-०.
इंग्लंड (दुसरा डाव): बैंक क्रॉली व्रि. गो. कुलदीप ६०, बेन डकेट झे. सरफराज गो. अश्विन १५. ओली पोप पायचीत गो, अश्विन ०, जो रुट पायचीत गो, अस्थिन ११, जॉनी बेअरस्टो झे. पाटीदार गो. जडेजा ३०, बेन स्टोक्स त्रि. गो. कुलदीप ४, बेन फोक्स हो, गो. अश्विन १७, टॉम हार्टली हो. सरफराज गो. कुलदीप ७. ओली रॉबिन्सन पायचीत गो. कुलदीप ०, शोएब बशीर नाबाद १, जेम्स अँडरसन झे. जुरेल गो. अश्विन ०. अवांतर ०, एकूण ५३.५ पटकांत सर्वबाद १४५ धावा, बाद क्रम: १-१९, २०११, ३-६५, ४-११०, ५-१२०, ६-१२०, ७-१३३, ८-१३३, ९-२४५, १०-१४५, गोलंदाजी: रविचंद्रन अश्विन १५.५-०-५8- ५. रवींद जडेजा २०-५-५६-१, मोहम्मद सिराज ३-०-२६-०, कुलदीप यादव १५-२-२२-४.
ब्रॅडमन, गावसकरांच्या पंक्तीत आता जैस्वाल जैस्वाल भारताचा दूसरा तर जगातला तिसरा फलंदाज ठरला आहे की, ज्याने वयाची २३ वर्षे पूर्ण करण्याआधीच एका कसोटी मालिकेत ६०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत जैस्वालने ७ डावामध्ये ६१८ धावांचा रतीब ओतला. २३ वर्षांचा होण्याआधी एका मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम डॉन बॅडमन याच्या नावावर आहे. त्यांनी १९३० साली इंग्लंडविरुद्ध ९७४ धावा केल्या होत्या. एका मालिकेत सर्वाधिक धावाचा हा विक्रम आहे. भारतीय विक्रम सुनील गावसकर यांच्या नावावर आहे. त्यांनी १९७० साली पदार्पणाची मालिका खेळताना वेस्ट इंडीजविरुद्ध ७७४ धावा केल्या होत्या.
• भारत (दुसरा डाव): रोहित शर्मा खेळत आहे २४, यशस्वी जैस्वाल खेळत आहे १६, अवातर ०, एकूण ८ षटकांत बिनबाद ४० धावा. गोलंदाजी: जो रुट ४-०-१७-०, टॉम हार्टली ३-०-२२-०, शोएब बशीर २-०-१-०.