लीड्स, इंग्लंड वि. पाकिस्तान : इंग्लंडने पाचव्या वन डे सामन्यातही पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली. इंग्लंडच्या 9 बाद 351 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ 297 धावांतच माघारी परतला. या सामन्यात इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीदने अश्यक्यप्राय रनआऊट केला आणि चाहत्यांना कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीची आठवण झाली. धोनीनं 2016च्या वन डे सामन्यात न्यूझीलंडच्या रॉस टेलरला असेच धावबाद केले होते आणि रशीदने काल त्याची कॉपी केली.
पाचव्या वन डे सामन्याच्या 27व्या षटकात हा प्रसंग घडला. पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम आणि कर्णधार सर्फराज अहमद हे मैदानावर होते. सर्फराजने रशीदच्या गोलंदाजीवर चेंडू हलकाच टोलवला आणि त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला असलेला बाबर रन घेण्यासाठी धावला. पण, सर्फराजने त्याला माघारी जाण्यास सांगितले आणि खेळपट्टीच्या मध्यभागात आल्यानंतर तो माघारी येण्यासाठी परतला. तेव्हा जोस बटलरने चेंडू रशीदच्या दिशेने फेकला आणि रशीदने धोनी स्टाईलने बाबरला धावबाद केले.
पाहा व्हिडीओ...