England vs Pakistan, 3rd Test: मालिकेत 1-0 अशा आघाडीवर असलेल्या इंग्लंड संघानं तिसऱ्या व शेवटच्या कसोटीत पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई केली. रोरी बर्न्स आणि डॉम सिब्ली हे सलामीवीर माघारी परतल्यानंतर झॅक क्रॅवली आणि जोस बटलर यांनी पाकिस्तानी गोलंदाजांची पिसे उपटली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी दोनशेहून अधिक धावांची भागीदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ झॅकने गाजवला. त्यानं कसोटीतील पहिलेच शतक झळकावले, दुसऱ्या दिवशी बटरलनं शतकी खेळी साकारली. पण, 99 धावांवर असताना पंचांनी त्याला बाद दिले होते.
होऊन जाऊ दे; निरोपाचा सामना न खेळलेले खेळाडू विरुद्ध टीम इंडिया; इरफान पठाणची भन्नाट कल्पना
कर्णधार जो रूट ( 29) आणि ओली पोप ( 3) यांनाही छाप पाडता आली नाही. झॅक आणि बटलर यांनी इंग्लंडचा डाव सावरला. झॅक 309 चेंडूंत 21 चौकारांच्या मदतीनं 182 धावांवर खेळत आहे. बटलरनं 199 चेंडूंत 11 चौकार व 2 षटकारांसह 107 धावा केल्या आहेत. 99 धावांवर असताना मोहम्मद अब्बासच्या गोलंदाजीवर पचांनी त्याला झेलबाद दिले. पण, बटलरनं लगेच DRS घेतला आणि पंचांचा निर्णय चूकीचा ठरला. पुढच्याच चेंडूवर बटलरनं शतकी धाव घेतली.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
IPL 2020 : RCBच्या खेळाडूंसोबत न जाता विराट कोहलीनं 'प्रायव्हेट' विमानानं घेतली दुबईसाठी भरारी
IPL 2020 : इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी नियमात सूट नाही; CSK, RR, KKR संघांना आलं टेंशन
Good News : लवकरच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतणार; सौरव गांगुलीनं दिले मोठे अपडेट्स
IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा नम्रपणा; स्वतःची बिझनेस क्लासची सीट दिली इकोनॉमी क्लासमधील प्रवाशाला
महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, BCCI आयोजित करणार निरोपाचा सामना; कधी व केव्हा?