जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल आजपासून सुरू होणार होती, परंतु साऊदॅम्प्टन येथे पावसाने धुमाकूळ घातला अन् भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचे दोन तास वाया गेले आहेत. आता पावसाने विश्रांती घेतली असली तरी खेळ सुरू होण्यासाठी आणखी तासभर वेळ लागेल. तेच दुसरीकडे ब्रिस्टॉल येथे भारतीय महिला संघ यजमान इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळत आहेत. 7 वर्षानंतर पहिली कसोटी खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने 17 वर्षीय शेफाली वर्मासह पाच खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली. शेफाली व स्मृती मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी केली, परंतु या दोघी माघारी परतल्यानंतर संघाचा डाव 231 धावांवर गडगडला अन् भारतीय महिलांवर फॉलोऑनची नामुष्की ओढावली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ENGW vs INDW : टीम इंडियाच्या 10 विकेट्स 64 धावांवर पडल्या, इंग्लंड दौऱ्यावर नोंदवला नकोसा विक्रम!
ENGW vs INDW : टीम इंडियाच्या 10 विकेट्स 64 धावांवर पडल्या, इंग्लंड दौऱ्यावर नोंदवला नकोसा विक्रम!
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल आजपासून सुरू होणार होती, परंतु साऊदॅम्प्टन येथे पावसाने धुमाकूळ घातला अन् भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचे दोन तास वाया गेले आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 5:28 PM