भारतीय महिला संघाची सलामीवीर शेफाली वर्मा हिनं इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत धमाकेदार खेळी केली. तिनं ३८ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ४८ धावांची केळी केली. तिला अर्धशतकानं हुलकावणी दिली असली तरी तिनं इंग्लंडची गोलंदाज कॅथरीन ब्रंटला चांगलाच इंगा दाखवला. पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात कॅथरीननं भारताच्या १७ वर्षीय खेळाडूला शून्यावर बाद केलं होतं आणि त्याची सव्याज परतफेड शेफालीनं दुसऱ्या सामन्यात केली. कॅथरीनच्या एकाच षटकात शेफालीनं सलग पाच खणखणीत चौकार खेचले.
शेफालीनं चौथ्या षटकात कॅथरीनवर हल्लाबोल केला. त्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर स्मृती मानधनानं एक धाव घेतली. त्यानंतर शेफालीनं सलग चार षटकार खेचले. शेफाली व स्मृती ( २०) यांनी पहिल्या विकेटसाठी ७० धावा जोडल्या. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर ( ३१) व दीप्ती श्रमा ( २४) यांनी संघाला ४ बाद १४८ धावांपर्यंत मजल मारून दिली. इंग्लंडला ८ बाद १४० धावा करता आल्या,
शाहिद आफ्रिदीच्या जावयावर भडकला शोएब अख्तर; म्हणाला, आधी विकेट घे अन् मग फ्लाईंग किस देत बस!
संक्षिप्त धावफलकभारत : २० षटकांत ४ बाद १४८. (शेफाली वर्मा ४८, हरमनप्रीत कौर ३१ दीप्ती शर्मा नाबाद २४; मॅडी व्हिलर्स १/९, सराह ग्लेन १/३१)
इंग्लंड : २० षटकांत ८ बाद १४० धावा. (टॅमी ब्यूमोंट ५९, हीथर नाइट ३०; पूनम यादव २/१७, दीप्ती शर्मा १/१८, अरुंधती रेड्डी १/३०)