मुंबई : शेर भूले ही बूढ़ा हो जाए, लेकिन वो शिकार करना कभी नहीं भूलता'... असं म्हटलं जातं. भारताचा माजी तडफदार सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्याबाबतीत ही गोष्ट खरी ठरते. कारण सेहवाग आता आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळत नाही, पण तरीही त्याची आक्रमक फलंदाजी पाहण्याचा योग काही चाहत्यांना आला.
केसीसी ही दहा षटकांची स्पर्धा खेळवली जाते. या स्पर्धेत सेहवाग कदंबा लायन्स संघाकडून सेहवाग खेळला होता. या सामन्यात सेहवाग सलामीला आला आणि त्याचे एकामागून एक जोरदार फटक्यांची माळ लावली. त्याची ही आक्रमक फलंदाजी पाहून संघातील खेळाडूंनी एकच जल्लोश केला.
सेहवागने याबाबत एक ट्विट केले होते. त्यावर ऑस्ट्रेलियाचा माजी महान फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने, ' शेर भूले ही बूढ़ा हो जाए, लेकिन वो शिकार करना कभी नहीं भूलता'... अशी टिप्पणी केली आहे.
सेहवागने ट्विट करताना लिहिले आहे की, " उसूल तब भीं वही था, अब भीं वही हैं. शुभ काम मे देर कैसी. एंटरटेनमेंट...एंटरटेनमेंट...एंटरटेनमेंट... अशी फलंदाजी करून मजा आली."