संपूर्ण देश लॉकडाऊन; आर अश्विननं जनतेला करून दिली 'त्या' प्रसंगाची आठवण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात २१ दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 11:21 AM2020-03-25T11:21:11+5:302020-03-25T11:22:23+5:30

whatsapp join usJoin us
Entire country lockdown; R Ashwin recalled the incident svg | संपूर्ण देश लॉकडाऊन; आर अश्विननं जनतेला करून दिली 'त्या' प्रसंगाची आठवण

संपूर्ण देश लॉकडाऊन; आर अश्विननं जनतेला करून दिली 'त्या' प्रसंगाची आठवण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे (सोशल डिस्टन्सिंग, सामाजिक दुरावा), घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असे कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात २१ दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. तरीही अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोकं गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. त्यांना भारताचा फिरकीपटू आर अश्विननं हटके मार्गानं समाजवण्याचा प्रयत्न केला आहे.

आतापर्यंत जगभरात 4, 22,829 कोरोना रुग्ण आढळले आहेत आणि त्यापैकी 18, 907 जणांचा मृत्यू झाला आहे. पण, एक लाखाहून अधिक लोकंही बरी झाली आहेत. भारतातील आकडा 562 झाला असून त्यापैकी 11 जणं दगावली आहेत. वारंवार सूचना करूनही लोकं सोशल डिस्टन्स राखत नसल्यानं मंगळवारी पंतप्रधान मोदींना देशभरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागला. तरीही लोकं घराबाहेर पडत आहेत. यावेळी अश्विननं मात्र त्यांना एक वर्षापूर्वी त्याच्यासोबत घडलेल्या एका प्रसंगाची आठवण करून दिली. 


काय आहे हा प्रसंग?
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) 2019च्या मोसमात किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या संघांमधीला हा प्रसंग आहे. गतवर्षी बरोबर आजच्याच दिवशी पंजाबचा कर्णधार अश्विननं राजस्थानच्या जोस बटलरला मांकड पद्धतीनं धावबाद केलं होतं. अश्विन गोलंदाजी करण्यापूर्वी नॉन स्ट्राईकर एंडला असलेल्या बटलरने क्रीज सोडले होते आणि अश्विननं त्याला कोणतीही पूर्वकल्पना न देता धावबाद केले. नियमाच्या चौकटीत अश्विनचा हा डाव योग्य होता, परंतु त्याच्यावर टीका झाली. याच घटनेचा संदर्भ देताना अश्विननं लोकांना घरात राहा, घराची सीमारेषा ओलांडू नका, अन्यथा.... असा सल्ला दिला आहे.

अन् अश्विननं त्याचं नाव बदललं
कोरोना व्हायरसबाबत जनजागृती करण्यासाठी अश्विननं ट्विटर अकाऊंटवरील त्याचं नाव बदलून lets stay indoors India असं केलं.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

लिओनेल मेस्सी अन् ख्रिस्तियानो रोनाल्डो यांंचा मदतीचा हात; सार्वजनिक हॉस्पिटलला कोट्यवधींची मदत

सानिया मिर्झाची समाजोपयोगी चळवळ; रोजंदारी कामगारांचे पोट भरण्याचा निर्धार

Web Title: Entire country lockdown; R Ashwin recalled the incident svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.