कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे (सोशल डिस्टन्सिंग, सामाजिक दुरावा), घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असे कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात २१ दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. तरीही अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोकं गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. त्यांना भारताचा फिरकीपटू आर अश्विननं हटके मार्गानं समाजवण्याचा प्रयत्न केला आहे.
आतापर्यंत जगभरात 4, 22,829 कोरोना रुग्ण आढळले आहेत आणि त्यापैकी 18, 907 जणांचा मृत्यू झाला आहे. पण, एक लाखाहून अधिक लोकंही बरी झाली आहेत. भारतातील आकडा 562 झाला असून त्यापैकी 11 जणं दगावली आहेत. वारंवार सूचना करूनही लोकं सोशल डिस्टन्स राखत नसल्यानं मंगळवारी पंतप्रधान मोदींना देशभरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागला. तरीही लोकं घराबाहेर पडत आहेत. यावेळी अश्विननं मात्र त्यांना एक वर्षापूर्वी त्याच्यासोबत घडलेल्या एका प्रसंगाची आठवण करून दिली.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
लिओनेल मेस्सी अन् ख्रिस्तियानो रोनाल्डो यांंचा मदतीचा हात; सार्वजनिक हॉस्पिटलला कोट्यवधींची मदत
सानिया मिर्झाची समाजोपयोगी चळवळ; रोजंदारी कामगारांचे पोट भरण्याचा निर्धार