MI vs RCB सामन्यातील हरणारा संघ Exit च्या वाटेवर; IPL 2024 Point Table चे समीकरण 

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील २५ वा सामना आज मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( MI vs RCB) यांच्यात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 03:34 PM2024-04-11T15:34:57+5:302024-04-11T15:35:15+5:30

whatsapp join usJoin us
Equation of IPL 2024 Point Table : 1 team with 8 points,  5 teams with 6 points, 1 team with 4 points &  3 teams with 2 points.  | MI vs RCB सामन्यातील हरणारा संघ Exit च्या वाटेवर; IPL 2024 Point Table चे समीकरण 

MI vs RCB सामन्यातील हरणारा संघ Exit च्या वाटेवर; IPL 2024 Point Table चे समीकरण 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 Point Table : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील २५ वा सामना आज मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( MI vs RCB) यांच्यात होणार आहे. आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स, लखनौ सुपर जायंट्स व मुंबई इंडियन्स यांचे प्रत्येकी ४ सामने झालेले आहेत. बाकी संघ किमान ५ किंवा त्याहून अधिक सामने खेळले आहेत. Point Table वर लक्ष टाकल्यात एकच संघ ज्यांच्या खात्यात ८ गुण आहेत, ५ संघाचे प्रत्येकी ६ गुण, १ संघाचे ४ व ३ संघांचे प्रत्येकी २ गुण आहेत. त्यामुळे आजचा MI vs RCB सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. आज हरणाऱ्या संघाची वाटचाल स्पर्धेबाहेर होण्याच्या दिशेने सुरू होणार आहे.


RCB vs MI यांच्या मागील ५ आयपीएल सामन्यांत फॅफ ड्यू प्लेसिसच्या संघाने चार विजय मिळवले आहेत. पण, वाखनेडेवर २०१३ पासूनच्या लढतीत ७ पैकी ६ लढती मुंबई इंडियन्से जिंकल्या आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात यजमान MI चे पारडे जड समजले जात आहे.  पण, यंदाच्या पर्वात दोन्ही संघांना अद्याप सूर गवसलेला नाही. मुंबईने ४मध्ये १, तर बंगळुरूने ५ मध्ये १ सामना जिंकला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातील पराभव हा दोन्ही संघांच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण करणारा ठरू शकतो.


राजस्थान रॉयल्सला काल गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला असला तरी ते ५ सामन्यांत ८ गुणांसह टेबल टॉपर आहेत. KKR व LSG यांनी ४पैकी ३ सामने जिंकून अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान टिकवले आहे. CSK ( ५ सामने ) , SRH ( ५) व GT ( ६) यांनीही ३ विजयासह खात्यात ६ गुण जमा केल आहेत, परंतु त्यांनी कोलकाता व लखनौ यांच्यापेक्षा जास्त सामने खेळले आहेत. पंजाब किंग्स ५ पैकी २ सामने जिंकून ४ गुण असलेला एकमेव संघ तालिकेत आहे. MI, RCB व DC यांना एकच विजय मिळवता आला आहे, परंतु मुंबईने ( ४) या दोन्ही संघापेक्षा एक सामना कमी खेळला आहे. 

Web Title: Equation of IPL 2024 Point Table : 1 team with 8 points,  5 teams with 6 points, 1 team with 4 points &  3 teams with 2 points. 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.