IPL 2024 Point Table : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील २५ वा सामना आज मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( MI vs RCB) यांच्यात होणार आहे. आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स, लखनौ सुपर जायंट्स व मुंबई इंडियन्स यांचे प्रत्येकी ४ सामने झालेले आहेत. बाकी संघ किमान ५ किंवा त्याहून अधिक सामने खेळले आहेत. Point Table वर लक्ष टाकल्यात एकच संघ ज्यांच्या खात्यात ८ गुण आहेत, ५ संघाचे प्रत्येकी ६ गुण, १ संघाचे ४ व ३ संघांचे प्रत्येकी २ गुण आहेत. त्यामुळे आजचा MI vs RCB सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. आज हरणाऱ्या संघाची वाटचाल स्पर्धेबाहेर होण्याच्या दिशेने सुरू होणार आहे.
RCB vs MI यांच्या मागील ५ आयपीएल सामन्यांत फॅफ ड्यू प्लेसिसच्या संघाने चार विजय मिळवले आहेत. पण, वाखनेडेवर २०१३ पासूनच्या लढतीत ७ पैकी ६ लढती मुंबई इंडियन्से जिंकल्या आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात यजमान MI चे पारडे जड समजले जात आहे. पण, यंदाच्या पर्वात दोन्ही संघांना अद्याप सूर गवसलेला नाही. मुंबईने ४मध्ये १, तर बंगळुरूने ५ मध्ये १ सामना जिंकला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातील पराभव हा दोन्ही संघांच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण करणारा ठरू शकतो.
राजस्थान रॉयल्सला काल गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला असला तरी ते ५ सामन्यांत ८ गुणांसह टेबल टॉपर आहेत. KKR व LSG यांनी ४पैकी ३ सामने जिंकून अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान टिकवले आहे. CSK ( ५ सामने ) , SRH ( ५) व GT ( ६) यांनीही ३ विजयासह खात्यात ६ गुण जमा केल आहेत, परंतु त्यांनी कोलकाता व लखनौ यांच्यापेक्षा जास्त सामने खेळले आहेत. पंजाब किंग्स ५ पैकी २ सामने जिंकून ४ गुण असलेला एकमेव संघ तालिकेत आहे. MI, RCB व DC यांना एकच विजय मिळवता आला आहे, परंतु मुंबईने ( ४) या दोन्ही संघापेक्षा एक सामना कमी खेळला आहे.