कॅनडा : भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर कॅनडात झालेल्या ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळला. या लीगदरम्यान खोडकर युवी पाहायला मिळाला. पण, एका खोडीमुळे युवीवर चक्क एका महिलेने खापर फोडले आहे. ग्लोबल ट्वेंटी-20 लीगच्या एका सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू बेन कटींगची मुलाखत सुरू होती आणि ती मुलाखत त्याची होणारी पत्नी एरिन हॉलंड घेत होती. त्यावेळी युवीनं घुसखोरी करताना त्या दोघांना तुम्ही लग्न कधी करताय, असा सवाल केला होता. युवीचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
एरिनने चाहत्याच्या या प्रश्नसाठी युवीला जबाबदार धरले. युवीनंही तिच्या प्रतिक्रियेवर स्माईल दिले.
या लीगमध्ये खेळवलेल्या 22 सामन्यांत 6759 धावांचा पाऊस पडला, तर 233 विकेट्स घेण्यात गोलंदाजांना यश आले. तब्बल 525 चौकार व 399 षटकार खेचले गेले. सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप पाच फलंदाजांत जेपी ड्यूमिनी ( 332), हेनरीच क्लासेन ( 326), शैमान अनवर ( 296), ख्रिस लीन ( 295) आणि रॉड्रीगो थॉमस ( 291) यांनी स्थान पटकावले. युवराज या क्रमवारीत 16व्या स्थानी राहिला. त्यानं दुखापतीमुळे एक सामना कमी खेळला. त्यानं 6 सामन्यांत 145.71च्या स्ट्राईक रेटने 153 धावा केल्या. त्यात 51 ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. त्यानं 11 चौकार व 10 षटकार मारले. गोलंदाजीतही त्याला 2 विकेट्स घेता आल्या.