आव्हानात्मक स्थितीत चुका झाल्या - अजिंक्य रहाणे

इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत पावसाच्या व्यत्ययात झालेल्या पहिल्या डावात १०७ धावांत गारद होण्यामागे आव्हानात्क परिस्थितीला सामोरे जाण्यात आलेले अपयश कारणीभूत ठरल्याचे उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सांगितले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 06:23 AM2018-08-12T06:23:21+5:302018-08-12T06:23:37+5:30

whatsapp join usJoin us
 Errors in challenging situations - Ajinkya Rahane | आव्हानात्मक स्थितीत चुका झाल्या - अजिंक्य रहाणे

आव्हानात्मक स्थितीत चुका झाल्या - अजिंक्य रहाणे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन : इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत पावसाच्या व्यत्ययात झालेल्या पहिल्या डावात १०७ धावांत गारद होण्यामागे आव्हानात्क परिस्थितीला सामोरे जाण्यात आलेले अपयश कारणीभूत ठरल्याचे उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सांगितले.
तो म्हणाला, ‘ड्यूक चेंडू आणि सोबतीला पावसाळी वातावरण असे दुहेरी आव्हान होते. एक फलंदाज या नात्याने अशा स्थितीला सामोरे जाताना स्वत:वर विश्वास असायला हवा. केवळ धावा काढण्याचेच नव्हे तर उत्कृष्ट बचाव करण्याचे आणि कुठला चेंडू सोडायचा याचा निर्णय घेण्याचेही आव्हान होते. फलंदाज म्हणून येथे खेळणे फारच आव्हानात्मक आहे. चुका झाल्या पण त्यावर तोडगा काढून पुढे जायला हवे. परिस्थिती फारच आव्हानात्मक होती. जेम्स अ‍ॅन्डरसनने एकही आखूड टप्प्याचा चेंडू टाकलेला नाही. तो एकाच टप्प्यावर मारा
करीत असल्याने फलंदाजांची परीक्षा होती. चेतेश्वर तिसºयांदा धावबाद झाला. याशिवाय खराब हवामानामुळे खेळ सुरू होण्यास चार तास
विलंब झाल्यामुळे घोर निराशा झाली.’ (वृत्तसंस्था)

ईशांतच्या आक्रमणाने बरे वाटले : नेहरा

मुंबई : भारताजवळ मजबूत वेगवान गोलंदाजी आक्रमण आहे अणि ईशांत शर्माला पहिल्या कसोटीत त्याचे नेतृत्व करताना पाहून चांगले वाटले, असे भारताचा माजी वेगवान गेलंदाज आशिष नेहरा याने सांगितले.
ईशांतने बर्मिंगहॅम येथे पहिल्या कसोटीत ७ गडी बाद केले. तथापि, भारताला ३१ धावांनी हा सामना गमवावा लागला.
नेहरा म्हणाला, ‘‘आमच्याजवळ अनेक पर्याय आहेत; परंतु सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे आमच्याकडे गुणवत्ता आहे. आमच्याकडे सहा, सात वेगवान गोलंदाज आहेत आणि आणखी एक दोन असून तेदेखील सुरेख आहेत. पहिल्या कसोटीत आम्ही २० गडी बाद केले आणि ईशांतसारख्या अनुभवी गोलंदाजाला नेतृत्व करताना पाहून चांगले वाटले. मोहंमद शमी जखमी होता आणि पुनरागमन करणे सोपे नव्हते; परंतु त्याने सुरेख गोलंदाजी केली. उमेश यादव खूप प्रतिभावान आहे.


जसप्रीत बुमराहनेही चांगली कामगिरी केली आहे आणि भुवनेश्वर कुमार वनडेत नंबर वन गोलंदाज आहे. नवदीप सैनी आणि मोहंमद सिराजही मागे नाहीत. दोघेही भारत अ संघात आहेत आणि मी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसोबत त्यांना पाहिले आहे. दोघेही खूप प्रतिभावान आहेत.’’ नेहरा याने अष्टपैलू हार्दिक पांड्या हा सलग दहा षटके गोलंदाजी करू शकत नाही. त्याला त्याच्या कामगिरीत सुधारणेची आवश्यकता असल्याचेही सांगितले. (वृत्तसंस्था)

गोलंदाजांना अनुकूल स्थिती होती : अ‍ॅन्डरसन
लंडन : दुसºया कसोटीच्या दुसºया दिवशी गोलंदाजांना अनुकूल स्थिती होती. यामुळे भारतच नव्हे तर कुठल्याही संघाला बाद करू शकलो असतो, असे मत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अ‍ॅन्डरसन याने व्यक्त केले. अ‍ॅन्डरसनने २० धावांत पाच गडी बाद करताच भारताचा पहिला डाव १०७ धावांत संपुष्टात आला.
अशा परिस्थितीत जगातील कुठल्याही संघाला आम्ही बाद करू शकलो असतो, असा दावा करीत अ‍ॅन्डरसन पुढे म्हणाला, ‘आम्ही अभावानेच खराब चेंडू टाकला. अशाप्रकारचा मारा आणि दडपणापुढे खेळणे फारच कठीण असते. आम्ही याच स्थितीचा लाभ घेतला. याचा फटका भारताला बसला असे नव्हे मीदेखील परिस्थिीचा लाभ घेत गोलंदाजी केली नसती तर वाईट वाटले असते.’

इंग्लंडमध्ये नेहमी अशी स्थिती उपलब्ध होत नाही. विराट कोहलीला बाद केल्याचा सर्वाधिक आनंद झाला. विराटसोबत प्रतिस्पर्धा करणे फार आवडत असल्याचे अ‍ॅन्डरसनने सांगितले. (वृत्तसंस्था)
 

Web Title:  Errors in challenging situations - Ajinkya Rahane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.