युरोप : युरोपीय क्रिकेट लीगमध्ये टी-10 लीगमध्ये चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. अहमद नबीनं या लीगमध्ये पहिल्या शतकवीराचा मान पटकावला, पण त्याचे हे शतक भल्याभल्या दिग्गज फलंदाजांना थक्क करणारे ठरले. ड्रॅक्स क्रिकेट क्लबच्या या फलंदाजाने 28 चेंडूंत शतकी खेळी केली. त्यात 14 षटकारांची आतषबाजी केली.
टी10 फॉरमॅटला अद्याप मान्यता मिळालेली नसली तरी सध्या या फॉरमॅटची चर्चा आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व करताना 2013च्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध 30 चेंडूत शतक केले होते. त्यानंतर क्लब क्रिकेटमध्ये भारताच्या वृद्धीमान सहाने 20 चेंडूत शतक केले आहे. त्या 14 षटकार व 4 चौकारांचा समावेश होता.
नबीच्या फटकेबाजीच्या जोरावर ड्रॅक्स संघाने 10 षटकांत 6 बाद 164 धावा केल्या. त्यानं पाच षटकं खेळून काढताना नाबाद 105 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना क्लज क्रिकेट क्लबला 10 षटकांत 5 बाद 69 धावा करता आल्या.
Web Title: European Cricket League: History Maker Ahmad Nabi, century off 28 balls for Dreux
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.