Virat Kohli: शतकानंतरही टी-२० वर्ल्डकपमध्ये ओपनिंग करू शकणार नाही विराट कोहली, हा आहे मोठा अडथळा

Virat Kohli: यावर्षी १६ अॉक्टोबरपासून अॉस्ट्रेलियामध्ये टी-२० वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ आपल्या अभियानाची सुरुवात २३ अॉक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यापासून करेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 06:05 PM2022-09-11T18:05:15+5:302022-09-11T18:05:47+5:30

whatsapp join usJoin us
Even after a century, Virat Kohli will not be able to open in the T20 World Cup, this is a big obstacle | Virat Kohli: शतकानंतरही टी-२० वर्ल्डकपमध्ये ओपनिंग करू शकणार नाही विराट कोहली, हा आहे मोठा अडथळा

Virat Kohli: शतकानंतरही टी-२० वर्ल्डकपमध्ये ओपनिंग करू शकणार नाही विराट कोहली, हा आहे मोठा अडथळा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई - यावर्षी १६ अॉक्टोबरपासून अॉस्ट्रेलियामध्ये टी-२० वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ आपल्या अभियानाची सुरुवात २३ अॉक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यापासून करेल. भारतीय संघाला यावर्षीच्या टी-२० विश्वचषकाच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे.
टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड ही १६ सप्टेंबर रोजी केली जाणार आहे. या संघात रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांची निवड निश्चित आहे. मात्र विराट कोहलीने सलामीला येत फटकावलेल्या शतकानंतर आता रोहित शर्माबरोबर ओपनिंगला कोण येणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र विराट कोहलीला सलामीला पाठवणे तितकेसे से सोपे नाही. विराट कोहली मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज आहे. तो मधल्या फळीत खेळतो तेव्हा संपूर्ण संघ त्याच्या भोवती खेळतो.

टी-२०विश्वचषकासाठी टीम इंडियाकडे खूप पर्याय आहेत. रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि दीपक हुडा सलामीसाठी दावेदार आहेत. मात्र टी-२० विश्वचषकात रोहित शर्मा आणि लोकेश राहुल हेच भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करण्याची शक्यता अधिक आहे.

Web Title: Even after a century, Virat Kohli will not be able to open in the T20 World Cup, this is a big obstacle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.