मुंबई : आपल्या तुफानी फटकेबाजीने भल्या भल्या गोलंदाजांना त्याने घाम फोडलाय... आपल्या जोरकस फटक्यांनी त्याने प्रतिस्पर्ध्यांना लोटांगण घालायला भाग पाडले आहे... काही गोलंदाज त्याच्या धडाकेबाज फलंदाजीपुढे नतमस्तकही झाले आहेत... पण भल्याभल्यांना घाबरवणारा क्रिकेटवीरही आता एका गोष्टीसाठी, 'हिला विचारून सांगतो'! असे म्हणत आहे...
भारताविरुद्धच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी भारताच्या गोलंदाजांना आपल्यापुढे नतमस्तक व्हायला भाग पाडले. या दोघांनी या सामन्यात विश्वविक्रम रचला आणि संघाला विजयही मिळवून दिला. वॉर्नर आणि फिंच या जोडीने भारताविरुद्ध अभेद्य २५८ धावांची भागीदारी रचली. आतापर्यंत वानखेडेवर भारताविरुद्ध झालेली ही सर्वाधिक भागीदारी आहे.
या सामन्यात वॉर्नरने इतिहास रचल्याचे पाहायला मिळाले आहे. वॉर्नरने या सामन्यात एक पराक्रम करत देशाला विजय मिळवून देण्याता मोलाचा वाटा उचलला आहे. वॉर्नरने यावेळी चौकारासह आपले शतक पूर्ण केले. वॉर्नरचे हे एकदिवसीय कारकिर्दीतील १८वे शतक ठरले. हे शतक साजरे करतना वॉर्नरने इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियाकडून सर्वात जलद पाच हजार धावा करण्याचा पराक्रम वॉर्नरने केला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांच्या नावावर होता.
या सामन्यानंतर वॉर्नरला काही प्रश्न विचारले गेले आणि या प्रश्नांना त्याने सहजपणे उत्तरं दिली. यावेळी २०२३ साली झालेल्या विश्वचषकात तू खेळणार का, असा प्रश्न वॉर्नरला विचारण्यात आला. या प्रश्नावर वॉर्नरने भावनिक उत्तर दिले. या प्रश्नाला उत्तर देताना वॉर्नर म्हणाला की, " मी आणि फिंच यांनी सध्या वयाची पस्तिशी ओलांडलेली आहे. मी ३६ वर्षांचा तर फिंच ३७ वर्षांचा आहे. मला तीन मुलेही आहेत. त्यामुळे याबाबत विचार करताना मी माझ्या पत्नीला पहिल्यांदा विचारेन."
भारताला पहिल्याच एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने जोरदार धक्का दिला. वानखेडेवर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनीच भारताच्य गोलंदाजांना धूळ चारत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. भारताचे २५६ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने एकही फलंदाज न गमावता सहजपणे पूर्ण केले.
सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी भारताच्या गोलंदाजांना आपल्यापुढे नतमस्तक व्हायला भाग पाडले. या दोघांनी द्विशतकी भागीदारी रचत भारताच्या हातून सामना सहजपणे हिरावला. वॉर्नरने यावेळी चौकारासह आपले शतक पूर्ण केले. वॉर्नरचे हे एकदिवसीय कारकिर्दीतील १८वे शतक ठरले.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात भारताच्या फलंदाजांकडून हाराकिरी पाहायला मिळाली. सलामीवीर शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी रचत भारताच्या धावसंख्येचा चांगला पाया रचला होता. पण या दोघांनंतर एकाही फलंदाजाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही आणि त्यामुळेच भारताला प्रथम फलंदाजी करताना २५५ धावांवर समाधान मानावे लागले.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. सलामीवीर रोहित शर्माने दोन चौकार लगावत चांगली सुरुवात केली, पण त्याला फक्त १० धावांवर समाधान मानावे लागले. पण त्यानंतर धवन आणि राहुल यांनी भारताचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी रचली. धवनने यावेळी ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ७४ धावा केल्या. राहुलला यावेळी अर्धशतकासाठी तीन धावा कमी पडल्या.
राहुल आणि धवन दोन षटकांमध्ये बाद झाले आणि त्यानंतर भारताचा डाव चांगलाच गडगडला. कर्णधार विराट कोहली, मुंबईकर श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा हे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांपुढे हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. अखेरच्या षटकांमध्ये मोहम्मद शमी आणि कुलदीप यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.