आयपीएलचा धडाका २००८ सालापासून सुरू झाला. या लीगने क्रिकेटविश्वाचे समीकरणच बदलून टाकले. खेळाडू आर्थिक दृष्टीने सक्षम झालेच, शिवाय क्रिकेटविश्वाला अनेक गुणवान खेळाडूही लाभले. आयपीएलमध्ये अनेक कर्णधार आले आणि आपली छाप पाडून गेले, पण एक कर्णधार कायम आपल्या नेतृत्वाच्या जोरावर आघाडीवर राहिला. चेन्नई सुपरकिंग्जने यंदा रवींद्र जडेजाला नेतृत्वाची संधी दिली. मात्र, संघासोबत वैयक्तिक कामगिरीही खालावल्याने त्याने कर्णधारपद सोडले आणि संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी पुन्हा धोनीच्या खांद्यावर आली. यासह चेन्नईचा सहभाग असलेल्या सर्व १३ सत्रांमध्ये या संघाला धोनीचे नेतृत्व लाभले आहे.
गांगुली-धोनी
जेव्हा धोनीने आयपीएलमध्ये खेळण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याने आपल्या वरिष्ठ खेळाडूंविरुद्ध चेन्नईचे नेतृत्व केले. पहिल्या सत्रापासून धोनी कर्णधार म्हणून वेगळा ठरला.
गंभीर-धोनीयानंतर धोनीने आपल्या संघ सहकाऱ्यांसह खेळताना चेन्नईचे नेतृत्व केले. गौतम गंभीर सारख्या सहकाऱ्यांच्या तुलनेत धोनी कर्णधार म्हणून यशस्वी ठरला.
कोहली-धोनीकाही वर्षांनी धोनीने आपल्याहून ज्युनिअर असलेल्या खेळाडूंविरुद्ध चेन्नईचे नेतृत्व केले. येथेही कर्णधार म्हणून धोनीने बाजी मारत सर्वांपुढे नवा आदर्श निर्माण केला.
पंत-धोनीआता धोनी आपल्याला आदर्श मानणाऱ्या खेळाडूंविरुद्ध चेन्नईचे नेतृत्व करत आहे. धोनी सामन्यानंतर युवा खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शनही करत आहे.