सचिनची ‘ती’ विकेट न मिळाल्याचे आजही दु:ख- सईद अजमल

विशेष म्हणजे तेव्हा पंच असलेले इयान गाउल्ड यांनीही नुकतेच म्हटले होते की, ‘सचिन त्यावेळी बाद होता, पण तिसऱ्या पंचांनी त्याला नाबाद ठरविले होते.’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 04:07 AM2020-04-29T04:07:14+5:302020-04-29T04:07:20+5:30

whatsapp join usJoin us
Even today, Sachin Ajmal is sad that he did not get a wicket - Saeed Ajmal | सचिनची ‘ती’ विकेट न मिळाल्याचे आजही दु:ख- सईद अजमल

सचिनची ‘ती’ विकेट न मिळाल्याचे आजही दु:ख- सईद अजमल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कराची : भारतात झालेल्या २०११ सालच्या विश्वचषक उपांत्य सामन्यात सचिन तेंडुलकरचा बळी न मिळाल्याची खंत अजूनही पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज सईद अजमल याला आहे. ‘त्यावेळी मी सचिनला बाद केले होते,’ असे आजही त्याचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे तेव्हा पंच असलेले इयान गाउल्ड यांनीही नुकतेच म्हटले होते की, ‘सचिन त्यावेळी बाद होता, पण तिसऱ्या पंचांनी त्याला नाबाद ठरविले होते.’
मोहाली येथे झालेल्या या उपांत्य सामन्यात सचिनने ८५ धावा फटकावल्या होत्या आणि या जोरावर भारताने सामना जिंकला होता.
सचिन वैयक्तिक २३ धावांवर असताना गाउल्ड यांनी अजमलच्या गोलंदाजीवर पायचीत बाद ठरविले होते. मात्र तिसरे पंच बिली बौडेन यांनी ‘रिव्ह्यू’मध्ये सचिनला नाबाद ठरविले होते. आयसीसी एलिट पॅनेलचे सदस्य राहिलेले गाउल्ड यांनी नुकतेच म्हटले होते की, ‘सचिनला बाद देण्याच्या निर्णयावर मी आजही ठाम आहे.’
त्या सामन्यातील आठवणींना उजाळा देताना अजमलने म्हटले की, ‘मी तो चेंडू सरळ टाकला होता आणि थेट सचिनच्या पॅडवर आदळला. मला पूर्ण विश्वास होता की, सचिन बाद आहे. शाहिद आफ्रिदी, कमरान अकमल, वहाब रियाझ आणि इतर सहकाऱ्यांनी सचिनच्या बाद होण्याविषयी माझ्याकडे विचारपूस केली. तेव्हा मी सांगितले होते की, हो.. सचिनची इनिंग समाप्त झाली आहे.’ मात्र तिसºया पंचांच्या निर्णयानंतर अजमल निराश झाला होता. तो म्हणाला, ‘कसोटी सामन्यात सचिनविरुद्ध गोलंदाजी करण्याची कधीही संधी मिळाली नाही, त्यामुळे जेव्हा कधी मर्यादित षटकांत त्याच्याविरुद्ध गोलंदाजीची संधी मिळायची, तेव्हा मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करायचो. आम्ही उपात्य फेरीत पराभूत झालो होतो, याचेच दु:ख सर्वाधिक होते. नक्कीच सचिनच्या ८५ धावांच्या खेळीमुळे तो सामना पूर्णपणे फिरला होता. आजही मला तिसºया पंचांचा तो निर्णय चकित करतो. पण त्या दिवशी सचिनला नशिबाची पूर्ण साथ होती आणि त्याने आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी खेळली.’ (वृत्तसंस्था)

Web Title: Even today, Sachin Ajmal is sad that he did not get a wicket - Saeed Ajmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.