मेलबोर्न : ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटू नॅथन लियोन हा मोटेरावरील खेळपट्टीवरून सुरू असलेल्या रणकंदनाने हैराण आहे. त्याने टिकाकारांवरच निशाणा साधला आहे. त्याच्या मते ‘चेंडू जेव्हा वळायला लागतो. तेव्हा सर्वजण रडायला सुरूवात करतात. जेव्हा जलदगती गोलंदाजीसाठी खेळपट्टी अनुकुल असते तेव्हा कुणीही काही बोलत नाही.’
इंग्लंडच्या तिसऱ्या कसोटीमध्ये दहा गड्यांनी झालेल्या पराभवात दोन्ही डावात संघ ११२ आणि ८१ धावांवर बाद झाला होता. मोटेराच्या खेळपट्टीवर काहींनी जोरदार टीकादेखील केली आहे. त्यात माजी कर्णधार मायकेल वॉन, एंड्र्यु स्ट्रॉस आणि एलेस्टर कुक यांचादेखील समावेश आहे. लियोन याने मात्र क्युरेटरचे कौतुक केले आहे. द वेस्ट ऑस्ट्रेलियनने लियोनच्या हवाल्याने लिहले आहे की, ‘ आम्ही जगभरातील जलदगती गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर खेळतो. तेव्हा ४७, ६० धावांवर बाद होतो. तेव्हा कुणीही काही बोलत नाही. मात्र जेव्हा खेळपट्टीवर चेंडू वळायला लागतो. तेव्हा जगभरात सर्वचजण त्या खेळपट्टीवर टीका करतात.’
भारत दिवस-रात्र कसोटी सामन्यात तीन फिरकीपटूंसह खेळत होता. तर इंग्लंडच्या संघात फक्त जॅक लीच हा एकच फिरकीपटू होता. लियोनने सांगितले की, या सामन्याती सर्वोत्तम बाब हीच होती की इंग्लंडचा संघ चार जलदगती गोलंदाजांसह उतरला होता. माझ्यासाठी हे खूप आहे. मला आणखी काही सांगायची गरज नाही.’
क्युरेटरला एससीजीवर आणण्याचा विचार तो पुढे म्हणाला की, ‘ मला हे कळत नाही. मला या खेळपट्टीत कोणतीच अडचण जाणवत नाही. ही एक रोमांचक खेळपट्टी आहे. ’ पिच क्युरेटर ते महान फिरकीपटू असा प्रवास करणाऱ्या लियोनने सांगितले की, तो अहमदाबादच्या क्युरेटरला सिडनीत आणणे पसंद करेल. मी पूर्ण रात्र हे पाहत होते. ते खूळ शानदार होते. मी त्या क्युरेटरला एससीजीवर आणण्याबाबत विचार करत आहे.’