ऑस्ट्रेलियचा माजी फिरकीपटू स्टुअर्ट मॅकगिल ( Stuart MacGill) याचे मागील महिन्यात घराजवळून गनपॉइंटवर अपहरण झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. पोलिसांनी यासंबंधित काही लोकांना अटक केल्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आले. ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक वृत्तपत्रांच्या माहितीनुसार दोन आठवड्यांपूर्वी गुन्हेगारांच्या टोळीनं मॅकगिल याचे अपहरण केले होते. BCCI ला २००० कोटींचं नुकसान, खेळाडूंच्या पगारावरही लागणार कात्री
मॅकगिल याचा ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूंमध्ये समावेश आहे. त्यानं १९९८ ते २००८ या कालावधीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. आपल्या कारकिर्दीत तो अनेकदा शेन वॉर्नच्या कामगिरीमागेच झाकोळला गेला. त्यामुळे वॉर्नसारखी प्रसिद्धी त्याला मिळू शकली नाही. त्यानं ४४ कसोटींत २०८ विकेट्स घेतले. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या लेग स्पिनर्समध्ये तो चौथ्या क्रमांकावर आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये न्यू साऊथ वेल्सचे प्रतिनिधित्व करताना त्यानं ३२८ विकेट्स घेतल्या आहेत. २००८मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आयपीएलचा उर्वरित टप्पा यावर्षी होणे अवघड, चेअरमन ब्रिजेश पटेल काय म्हणाले घ्या जाणून!
नेमकं काय घडलं?पोलिसांच्या माहितीनुसार १४ एप्रिलला मॅकगिल त्याच्या घराजवळील क्रेमोर्न येथील वाइन स्ट्रीटवर जात होते. तेव्हा त्याच्यानजीक एक ४६वर्षीय व्यक्ती आली आणि त्याच्याशी बोलू लागली. काही वेळआनंतर तिथे दोन माणसं आली आणि त्यांनी जबरदस्तीनं मॅकगिलला गाडीत बसवण्याचा प्रयत्न करू लागले. तेथून त्याला दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले आणि मारहाण केली. त्यानंतर धमकी दिली गेली. एका तासानंतर बेलमोर येथे त्याला सोडण्यात आले. त्याला गंभीर जखमा झाल्या नाही, परंतु एका आठवड्यानंतर त्यानं पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक करम्यात आली आहे. कोरोना काळात कमावलेत तेवढे किंवा १००० कोटी वैद्यकिय मदतीसाठी द्या; वकिलाची बॉम्बे उच्च न्यायालयात याचिका