भारतीय संघाचा व चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू सुरेश रैना ( Suresh Raina) याने मंगळवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath) यांची भेट घेतली. इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये त्याला कोणत्याच संघाने आपल्या ताफ्यात घेतले नाही, त्यामुळे तो IPL 2022 मध्ये समालोचकाच्या भूमिकेत दिसला. पण, सध्या त्याने ब्रेक घेतला आहे. त्यात त्याने मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची भेट घेतल्याने विविध तर्क लावले जात आहे. नेटकरी वेगवेगळे अंदाज बांधताना दिसत आहेत.
Mr. IPL सुरेश रैनाला आयपीएल २०२२साठी झालेल्या लिलावात कोणीच वाली मिळाला नाही. सुरेश रैनाला २०२१च्या आयपीएलमध्ये साजेशी कामगिरीही करता आली नाही. रैनाने १२ सामन्यांत १६० धावाच केल्या होत्या. एकूण आयपीएलमध्ये २०५ सामन्यांत ३२.५१च्या सरासरीने ५५२८ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय त्याने २५ विकेट्सही घेतल्या आहेत. रैनाने ५०६ चौकार व २०३ षटकार खेचले आहेत आणि १०८ झेलही टिपले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत रैना चौथ्या क्रमांकावर आहे. विराट कोहली ( ६२८३), रोहित शर्मा ( ५७८४) व शिखर धवन (५६११) हे आघाडीवर आहेत.
Web Title: Ex Chennai Super Kings player Suresh Raina meet UP CM Yogi Adityanath, Photo viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.