पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सईद अन्वर ( Saeed Anwar) याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. अन्वर याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि त्यात तो सामान्य लोकांमध्ये भारताविरोधात द्वेष पसरवत आहे. @pakistan_untold या हँडलने ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, सईद अन्वरने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करत आहे. सईद अन्वरने पंतप्रधान मोदींना शैतान म्हटले आहे. तो म्हणाला, अजानसाठी तुम्ही तुमचे भाषण किती वेळा थांबवले याने काही फरक पडत नाही. तुम्ही शैतान आहात.
सईद अन्वरने १९८९ ते २००३ या कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. यादरम्यान अन्वरने ५५ कसोटीत ४५.५२च्या सरासरीने ४०५२ धावा केल्या. त्यात ११ शतकांचाही समावेश आहे. याशिवाय सईद अन्वरने २४७ वन डे सामनेही खेळले आणि ८८२४ धावा केल्या व २० शतकं झळकावली. अन्वरची कसोटीत नाबाद १८८ आणि वन डेत १९४ ही सर्वोच्च धावसंख्या आहे. सईद अन्वरने सात सामन्यांमध्ये
पाकिस्तान संघाचे कसोटीत नेतृत्व केले. यापैकी पाकिस्तानला केवळ एकच विजय मिळवता आला. त्याच वेळी, वन डे फॉरमॅटमध्ये त्याने 11 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. यामध्ये पाकिस्तानला २०१४ मध्ये विजय आणि २०१४ मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते.
सईद अन्वरने 1996 मध्ये चुलत बहिण लुबना अन्वरशी लग्न केले. 1997 मध्ये लुब्नाने मुलगी बिस्माला जन्म दिला. मात्र, वयाच्या अवघ्या ३.५ व्या वर्षी बिस्माचा मृत्यू झाला. बिस्माह यांचे निधन झाले तेव्हा सईद अन्वर बांगलादेशविरुद्ध कसोटी सामना खेळत होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Ex-Pakistan Opener Saeed Anwar Attacks India's PM Narendra Modi, Calls Him 'Shaitan'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.