Join us  

Corona Virus : क्वारंटाईनमुळे पाकिस्तानी खेळाडूची झाली अशी अवस्था; पाहा Video

पाकिस्तानातील कोरोना रुग्णांची संख्या 4062 वर गेली असून 58 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 12:51 PM

Open in App

कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा जगभरातील आकडा 14 लाख 31,973 इतका झाला आहे. मृतांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत असून सध्या हा आकहा 82,096 इतका झाला आहे. आतापर्यंत 3 लाख 02,209 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना व्हायरसमुळे अनेक क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंना घरीच रहावे लागत आहे आणि त्यांना कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत आहे. पण, कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना लहान मुलं काय करतीय याचा नेम नाही. पाकिस्तानचा माजी फिरकीपटू साकलेन मुश्ताकला त्याचा चांगलाच अनुभव आला आहे.

साकलेनच्या मुलीनं त्याचा चांगलाचे मेक अप केला आहे आणि त्यानं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून लोकांना घरी राहण्याचं आवाहन केलं आहे. या व्हिडीओत साकलेननं डोक्यावर महिलांची विग घातली आहे आणि गुलाबी रंगांची लिस्टिक लावली आहे. 

पाहा व्हिडीओ... साकलेननं आपल्या कारकिर्दीत 1300 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 800 आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये 400 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. पाकिस्तानकडून त्यानं कसोटीत 208 आणि वन डेत 288 विकेट्स घेतल्या आहेत.  

पाकिस्तानच्या मदतीसाठी ब्रिटनचा आमीर खान सरसावला, करतोय धान्याचं वाटप 

माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी त्याच्या फाऊंडेशनतर्फे लॉक़डाऊन भागारीत गरिबांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचं काम करत आहे. त्याच्या मदतीला आला ब्रिटनचा आमीर खान पुढे आला आहे. बॉक्सर आमीर खान यानेही मदतीचा हात पुढे केला आहे. मँचेस्टर येथील बॉल्टन येथे जन्मलेला आमीरचे मुळ पाकिस्तानातील रावळपिंडीचे आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील रावळपिंडी जिल्ह्यातील पंजाबी रजपूत कुटुंबाशी त्याचं नातं आहे. त्यामुळे आमीरनं पाकिस्तानच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यानं पाकिस्तानी सैन्याची मदत घेतली आहे.

त्यानं लिहीलं की,''अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे पाकिस्तानात अनेक लोकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या मदतीसाठीमी तांदूळ, पीठ, ज्युस, पाणी, पावडर मिल्क, साबण पाठवत आहे. पाकिस्तानी सैन्य या वस्तूंचा वाटप करण्यासाठी मला मदत करत आहेत. त्यांचे आभार.'' 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

'त्या' एका निर्णयामुळे भारतीय खेळाडूवरील संकट टळलं!

15 वर्षीय खेळाडूनं विकल्या त्याच्याकडच्या 102 ट्रॉफी; जमा केलेला निधी केला दान

इंग्लंडच्या खेळाडूनं वर्ल्ड कप जर्सी लाखांत विकली; हॉस्पिटल्सना केली मदत 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यापाकिस्तान