मुंबई : यश आणि अपयश प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते. पण अपयश आल्यावर बरेच जणं खचून जातात आणि त्यांना आयुष्यात उभे राहता येत नाही. पण काही व्यक्ती मात्र अपयशाला बिलगतात आणि त्याच्यामधून शिकून यशाच्या शिखरावर जातात. सध्याच्या घडीला असाच एक खेळाडू यशोशिखरावर पोहोचला आहे. आपल्या आलेल्या अपयशातून तो कसा बाहेर पडला, हेदेखील रहस्य सांगितले आहे. आता हा खेळाडू कोण, याची उत्सुकता तुम्हाला असेल. तर हा खेळाडू म्हणजे भारताचा कर्णधार विराट कोहली.
कोहली म्हणाला की, " तुम्ही अपयशाला टाळू शकत नाही आणि तुम्ही यशाबद्दल कोणतेच भाकित करू शकत नाही. वाईट परिस्थितीमधून जर बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला फक्त एकच गोष्ट करता येते. कारण ती गोष्ट तुमच्या हातामध्ये असते. ती गोष्ट म्हणजे फक्त मेहनत आणि मेहनत."
कोहली म्हणाला की, " तुम्हाला अपयश बरंच काही शिकवून जातं. यश तुम्हाला काही शिकवत नाही. यशानंतर तुम्हाला वाटतं, की सारं काही बरोबरच सुरु आहे. त्यामुळे तुम्ही अन्य कुठेही पाहत नाही. त्यामुळे तुम्हाला आपल्या चुका समजत नाहीत. माझ्यामते अपयशाने माणूस पुन्हा एकदा जमिनीवर येतो आणि पुन्हा एकचा नव्याने विचार करतो. तुम्ही जर सातत्याने मेहनत केली तर नक्कीच तुम्हाला यश मिळतं. त्यामुळे अपयश आल्यावर खचून जायचं नसतं."
ना सचिन ना शास्त्री; आपल्या आयुष्यातील खरा सुपरहिरो सांगतोय विराट कोहलीमुंबई : प्रत्येकाच्या आयुष्यात एक सुपरहिरो असतो. त्या सुपरहिरोला डोळ्यापुढे ठेवून आपण आयुष्यात बऱ्याच गोष्टी करत असतो. भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या आयुष्यातही एक सुपरहिरो आहे. पण हा सुपरहिरो त्याचा आदर्श क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर नाही किंवा सध्या त्याचे ज्यांच्याबरोबर सुत जुळले आहे ते संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रीही नाहीत. मग कोहलीच्या आयुष्यातील खरा सुपरहिरो आहे तरी कोण...
विराट नेहमीह म्हणत आला आहे की, मी सचिनला पाहून क्रिकेट खेळायला लागलो. सचिन माझ्यासाठी आदर्शवत आहे. त्यामुळेच कोहलीने एकदा शतक झळकावल्यावर मैदानातूनच कोहली सचिनच्या पाया पडला होता. कोहलीसाठी सचिन आदर्शवत असला तरी तो त्याचा सुपरहिरो नक्कीच नाही.
कोहली आणि शास्त्री यांचीच भारतीय संघात चलती आहे. या दोघांची विचारधारा सारखीच असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे कोहली आणि शास्त्री यांचे चांगलेच जमते. या गोष्टीचा प्रत्यय आपल्याला बऱ्याचदा आलेला आहे. शास्त्री हे आपल्यासाठी फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइड असल्याचेही कोहलीने म्हटले आहे. पण शास्त्रीदेखील कोहलीचे सुपरहिरो नाहीत.
आपल्या आयुष्यातील सुपरहिरोबद्दल कोहली म्हणाला की, " माझ्या आयुष्यातील सुपरहिरो माझे बाबा आहेत. कारण त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो आहे. त्यांनी माझ्यासाठी जे निर्णय घेतले त्यांचा नक्कीच मला आता फायदा होतो आहे. मी भारतासाठी खेळावे हे त्यांचे स्वप्न होते आणि हे स्वप्न आता सत्यात उतरले आहे."
कोहलीच्या वडिलांचे निधन 19 डिसेंबर 2006 या दिवशी झाले. पण त्याच दिवशी कोहलीचा एक सामना होता. वडिलांच्या निधनानंतरही तो हा सामना खेळायला गेला होता. याबाबत कोहली म्हणाला की, " कमिटमेंट, ही गोष्ट सर्वात महत्वाची असते. तुम्ही फक्त एखादी गोष्ट करून त्याचा काही फायदा नसतो. तुम्ही एखादी गोष्ट करून काही वेळाने सोडूनही देता. पण जर कमिटमेंट असेल तर तुम्ही सातत्याने ती गोष्ट करता आणि त्यानंतरच तुम्हाला यश मिळते. जेव्हा माझे बाबा वारले तेव्हा मी दु:खी होतो. पण दुसरीकडे संघाला माझी गरज होती. त्यामुळे ती कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी मला जावे लागले होते."