प्रसाद लाड, मुंबई : सध्याच्या घडीला दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांच्या रडारवर आहे तो भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा. वेस्ट इंडिजमध्ये हॅट्रिक घेत बुमराने इतिहास रचला होता. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यांसाठी तो खास तयारी करतो आहे.
बुमराची कामगिरी भारतापेक्षा परदेशामध्ये चांगली झाली आहे. पण आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बुमराला भारतामध्ये गोलंदाजी करायची आहे. या गोष्टीची तयारी बुमरा आता करत आहे. याबाबत बुमराला विचारल्यावर तो म्हणाला की, " विदेशामध्ये मी जरी चांगली कामगिरी केली असली तरी भारतामध्ये मी बऱ्याच स्थानिक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यांसाठी मी खास तयारी केली आहे. मैदानात या खास गोष्टी तुम्हाला पाहायला मिळेल." बुमरामहेंद्रसिंग धोनी कधी निवृत्त होईल, सांगतोय जसप्रीत बुमरासध्याच्या घडीला क्रिकेट वर्तुळामध्ये एक चर्चा सर्वात जोरात सुरु आहे आणि ती गोष्ट म्हणजे महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची. गुरुवारी धोनी निवृत्त होणार अशा अफवा उठल्या होत्या. पण धोनी नेमकी निवृत्ती कधी जाहीर करणार याबाबत भाष्य भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने एका खास मुलाखतीमध्ये सांगितले आहे. ' लोकमत डॉट कॉम'ला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये बुमराने धोनी आणि कोहली यांच्या नेतृत्वाबद्दलही भाष्य केले आहे. धोनी कर्णधार असताना बुमराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. धोनीच्या निवृत्तीबाबत विचारले असता बुमरा म्हणाला की, " धोनी हा एक दिग्गज क्रिकेटपटू आहे. विश्वचषक जिंकत त्याने बऱ्याच भारतीयांचे स्वप्न साकार केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मला संधी मिळाली, म्हणून माझ्यासाठी नेहमीच तो खास कर्णधार असेल. त्याचे नेतृत्व मी कधीही विसरू शकणार नाही. आता एवढ्या मोठ्या खेळाडूच्या निवृत्तीबाबत मी काय सांगणार? धोनी हा निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे. तो उचित वेळ आल्यावर आपल्या निवृत्तीचा निर्णय नक्कीच घेईल. "