IND vs ENG 1st Test ( Marathi News ) : पाकिस्तानी वंशाचा आणि इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या शोएब बशीर ( Shoaib Bashir ) याला पहिल्या कसोटीतून माघार घ्यावी लागली. पाकिस्तानी वंशाच्या २० वर्षीय खेळाडूचा व्हिसा वेळेत मंजूर न झाल्याने त्याला लंडनमध्ये परत जावे लागले. त्यामुळे त्याला युएईतून त्याला मायदेशी जावे लागले. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यानेही नाराजी व्यक्त केली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा यानेही बशीरचा व्हिसाचा प्रश्न लवकरच सुटेल, असा विश्वास व्यक्त केला. त्यात आता यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या कार्यालयातून प्रतिक्रिया आली आहे.
"मी या प्रकरणाच्या तपशीलाबद्दल बोलू शकत नाही. आम्ही यापूर्वी उच्चायुक्तांसमोर हे मुद्दे मांडले आहेत. आम्ही स्पष्ट केले आहे की, भारताने आपल्या व्हिसा प्रक्रियेत ब्रिटीश नागरिकांना नेहमीच न्याय्य वागणूक दिली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. पाकिस्तानी वारसा असलेल्या ब्रिटीश नागरिकांनी अनुभवलेल्या समस्या आम्ही यापूर्वी मांडल्या आहेत. आम्ही लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांकडे व्हिसासाठी अर्ज करतानाच्या त्यांच्या अनुभवाविषयी मुद्दे मांडले आहेत," असे सुनक यांच्या कार्यालयातील प्रवक्त्याने बीबीसीच्या हवाल्याने सांगितले.
जून २०२३ मध्ये बशीर याने सोमरसेट क्लबकडून ट्वेंटी-२०त पदार्पण केले आणि त्याच्या ४ दिवस आधी त्याने एसेक्सविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने ६ प्रथम श्रेणी व ७ लिस्ट ए क्रिकेट सामने खेळले आहेत.
४ फिरकीपटू, १ जलदगती गोलंदाज...
भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडने आज त्यांची प्लेइंग इलेव्हन जाहीर केली. इंग्लंडने जाहीर केलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार फिरकीपटू व एका जलदगती गोलंदाजाचा समावेश केला आहे. लँकशायर क्लबचा टॉम हार्टली उद्या कसोटी पदार्पण करणार आहे. ऑली पोप, बेन फोक्स, रेहान अहमद व जॅक लीच हे चार खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मागील कसोटीत संघात नव्हते. पण, भारताविरुद्ध त्यांचे पुनरागमन झाले आहे.
इंग्लंडचा संघ ( England Men's XI ) - झॅक क्रॅव्ली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, बेन स्टोक्स ( कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वूड, जॅक लिच
Web Title: "Expect India To Treat British Citizens Fairly", UK PM Rishi Sunak's Office Reacts On England bowler Shoaib Bashir's Visa Issue
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.