लखनौ : भारतीय महिला क्रिकेट संघात ‘पॉवर हिटर’ची मागच्या काही वर्षांपासून उणीव जाणवत आहे. द. आफ्रकेविरुद्ध आज रविवारी खेळल्या जाणाऱ्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात अष्टपैलू दीप्ती शर्मा आणि यष्टिरक्षक सुषमा वर्मा ही उणीव भरून काढतील, अशी अपेक्षा आहे. (Expectations from the ‘Power Heater’, the fourth ODI today)
पहिला सामना गमावणाऱ्या भारताने दुसरा सामना जिंकून मुसंडी मारली होती. मिताली राजच्या नेतृत्वाखालील संघाने तिसरा सामना मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस नियमानुसार सहा धावांनी गमावला. भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत असताना अखेरच्या पाच षटकांत केवळ २७ धावा निघाल्याने ५ बाद २४८ अशी माफक मजल गाठता आली. पुढच्या वर्षी होणाऱ्या विश्वचषकावर लक्ष केंद्रित करून डेथ ओव्हरमधील धावांची गती वाढविण्यात सुधारणा करणे गरजेचे आहे. अखेरच्या दहा षटकांत वेगवान धावा काढणारे फलंदाज हवेत, अशी बोलकी प्रतिक्रिया मितलीने काल सामन्यानंतर दिली. तळाच्या फलंदाजांकडून अपेक्षा करणे व्यर्थ आहे. हरमनप्रीत आणि दीप्ती शर्मा यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. नीतू डेव्हिड यांच्या निवड समितीनेे वर्मासारख्या खेळाडूला बाहेर ठेवले.
उभय संघ असे -
भारत : मिताली राज (कर्णधार), स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स, पूनम राऊत, प्रिया पूनिया, यस्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर, डी हेमलता, दीप्ती शर्मा, सुषमा वर्मा, स्वेता वर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, झूलन गोस्वामी, मानसी जोशी, पूनम यादव, सी प्रत्यूषा और मोनिका पटेल.
दक्षिण आफ्रिका : सुने लुस (कर्णधार), अयाबोंगा खाका, शबनिम इस्माइल, लॉरा वोल्वार्ट, त्रिशा चेट्टी, सिनालो जाफ्ता, तस्मीन ब्रिट्ज, मारिजाने कॅंप, नोंडुमिसो सांगेज, लिझेल ली, एनेके बॉश, फाये ट्यूनिक्लिफ, नॉनकुलुलेको मलाबा, मिनगोन डु प्रीज, नेदिन डि क्लर्क, लारा गुडाल, टुमी सेखुखुने.
Web Title: Expectations from the ‘Power Heater’, the fourth ODI today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.