अबूधाबी : सलामी लढतीत गत चॅम्पियन मुंबई इंडियन्सविरुद्ध पाच गडी राखून मिळविलेल्या विजयात संघाचा अनुभव महत्त्वाचा ठरला, अशी प्रतिक्रिया चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केली.धोनी म्हणाला,‘अनुभव उपयुक्त ठरला. सर्वंच याबाबत चर्चा करीत आहे. अनेक सामने खेळल्यानंतर तुम्ही अनुभवसंपन्न होता. ३०० वन-डे सामने खेळणे कुठल्याही क्रिकेटपटूचे स्वप्न असते. ज्यावेळी मैदानावर संघ उतरविता त्यावेळी अनुभवी व युवा खेळाडूंचा योग्य ताळमेळ साधला जाणे आवश्यक असते. मैदानावर युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी खेळाडूंची गरज असते. लक्ष्याचा पाठलाग करताना दवामुळे चेंडू मुव्ह होतो. अशा स्थितीत तुमच्याकडे विकेट शिल्लक असेल तर लाभ घेता येतो.’ मैदानावर उतरणे वेगळेच असते, असेही गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणाऱ्या धोनीने सांगितले. दरम्यान, डेथ ओव्हर्समध्ये चांगली फलंदाजी न करणे आमच्या पराभवाचे एक कारण असल्याची कबुली मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने दिली.रोहित म्हणाला,‘आमच्या एकाही फलंदाजाला ड्युप्लेसिस व रायुडूप्रमाणे मोठी खेळी करता आली नाही. आम्ही पहिल्या १० षटकांत ८६ धावा केल्या होत्या. चेन्नईच्या गोलंदाजांनाही श्रेय द्यायल हवे. त्यांनी अखेरच्या षटकांमध्ये भेदक मारा केला.’
लॉकडाऊनची कमाल, वाढला पोटाचा घेरअबूधाबी : पहिल्या सामन्याचे शिल्पकार अंबाती रायुडू आणि फाफ डुप्लासिस चर्चेत राहिले, तर रोहित शर्मा किंवा पीयूष चावला यांच्यासारखे खेळाडू वेगळ्या कारणामुळे ट्रोल झाले.हे खेळाडू वाढलेल्या पोटामुळे चाहत्यांच्या टीकेचे धनी ठरले. कोरोना लॉकडाऊननंतर अनेक खेळाडू मैदानावर आले. याची झलक रोहित आणि पीयूष यांच्या वाढलेल्या पोटाकडे बघून दिसली.त्यातही मुरली विजय सर्वांत आघाडीवर होता. समालोचक हर्षा भोगलेने यावर ‘अनेकांची कंबर आज हेल्दी आढळून आली,’ असे टिष्ट्वट केले.