Join us  

IND vs AUS FINAL : वर्ल्ड कप फायनलमध्ये रोहित हुकुमी एक्का काढणार! ऑस्ट्रेलियाला कोंडीत पकडणार

रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात किताबासाठी लढत होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 12:46 PM

Open in App

ICC ODI World Cup 2023 | अहमदाबाद : आयसीसीचा किताब जिंकून तमाम भारतीयांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघावर आहे. रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात किताबासाठी लढत होत आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर जास्त उसळी नसल्याने फिरकीपटूंना अधिक मदत मिळू शकते. त्यामुळे उद्याच्या सामन्यासाठी भारतीय संघात एक बदल पाहायला मिळू शकतो. अनुभवी फिरकीपटू आर अश्विनला भारतीय संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.  

ऑस्ट्रेलियन संघात डावखुऱ्या फलंदाजांची संख्या अधिक असल्याने अश्विनला संधी मिळू शकते. अश्विनचा अनुभव अन् डावखुऱ्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात फसवण्याची त्याची क्षमता भारताची बाजू मजबूत करेल. त्यामुळे उद्या एका अतिरिक्त फिरकीपटूसह भारतीय संघ मैदानात उतरू शकतो. जलदगती गोलंदाजांना सुरुवातीला मदत मिळेल पण नंतर फिरकी गोलंदाजांचा करिश्मा दिसेल, असे अनेक जाणकारांनी सांगितले. त्यामुळे अंतिम सामन्यात मोहम्मद सिराजला वगळून आर अश्विनला संधी मिळू शकते. 

फायनलसाठी भारताचा संभाव्य संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी. 

न्यूझीलंडचा पराभव करून फायनलमध्ये धडक भारतीय संघाने विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. आपल्या अखेरच्या सामन्यात नेदरलँड्सविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने ४ गडी गमावून ४१० धावांची विशाल धावसंख्या उभारली. श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांनी शतकी खेळी करून भारताच्या नवव्या विजयात मोलाची भूमिका बजावली. अय्यरने नाबाद १२८ धावा केल्या तर राहुलने १०२ धावांचे योगदान दिले. ४११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संघ २५० धावांत आटोपला. स्कॉट एडवर्ड्सच्या नेतृत्वातील नेदरलँड्सला यंदाच्या विश्वचषकात ९ सामन्यांमध्ये २ विजय मिळवता आले. पण, नेदरलँड्सने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारून क्रिकेट विश्वाला धक्का दिला. त्यांनी आफ्रिकेला ३८ तर बांगलादेशला ८७ धावांनी पराभूत केले. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियानरेंद्र मोदी स्टेडियमआर अश्विनमोहम्मद सिराज