Explainer: How the Asia Cup Super Four stage works : अफगाणिस्तान, भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान या चार संघांनी आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या सुपर ४ मध्ये प्रवेश केला. बांगलादेश व हाँगकाँग यांचे आव्हान साखळी फेरीत संपुष्टात आले. आता या चार संघांमध्ये जेतेपदाची शर्यत रंगणार आहे, परंतु उपांत्य फेरीचे सामने न होता, थेट अंतिम फेरीत दोन संघ भिडणार आहेत. अंतिम फेरीतील दोन संघ कसे ठरतील, यामागचं समीकरणा जाणून घेऊया...
आशिया चषकाचा इतिहास!१९८४ मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा २०१४पर्यंत ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवली गेली. २०१६मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया चषकही ट्वेंटी-२०त खेळवण्यात आला होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकावले होते. २०१८मध्ये पुन्हा वन डे फॉरमॅटमध्ये आशिया चषक झाला आणि तेव्हाही भारताने बाजी मारली. आतापर्यंत झालेल्या १३ पर्वांत भारताने सर्वाधिक ७ जेतेपदं पटकावली आहेत. पाच जेतेपदांसह श्रीलंका दुसऱ्या आणि दोन विजयासह पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे.
आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने धक्कादायक निकाल नोंदवताना श्रीलंका व बांगलादेश यांच्यावर विजय मिळवून ब गटातून सुपर ४ मध्ये पहिले स्थान पटकावले. त्यापाठोपाठा पाकिस्तान व हाँगकाँगला नमवून भारतीय संघ अ गटातून सुपर ४ मध्ये दाखल झाला. करो वा मरो सामन्यात श्रीलंका व पाकिस्तान यांनी अनुक्रमे बांगलादेश व हाँगकाँगवर विजय मिळवून सुपर ४ मधील आपले स्थान पक्के केले.
सुपर ४ चे वेळापत्रक...
- ३ सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
- ४ सप्टेंबर - भारत विरुद्ध पाकिस्तान, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
- ६ सप्टेंबर - भारत विरुद्ध श्रीलंका, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
- ७ सप्टेंबर- अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
- ८ सप्टेंबर- भारत विरुद्ध अफगाणिस्तान, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
- ९ सप्टेंबर- श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
- ११ सप्टेंबर- फायनल, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून, दुबई
अंतिम सामना कोणामध्ये होणार?सुपर ४ मधील प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध खेळणार... उदा. भारताचा सामना श्रीलंका, पाकिस्तान व अफगाणिस्तानशी होणार. सुपर ४ मध्ये एकूण ६ लढती होती आणि त्यानंतर जो संघ गुणतालिकेत अव्वल दोन क्रमांकावर राहिल त्यांच्यात जेतेपदाचा सामना खेळवला जाईल.