बरोबर एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात कडवी टक्कर पाहायला मिळाली होती. सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत सुटल्यानंतर इंग्लंडला अधिक चौकाराच्या नियमानुसार विजयी घोषित केले गेले. त्यानंतर अनेक वाद झाले आणि आयसीसीनं अखेर यापुढे निकाल लागेपर्यंत सुपर ओव्हर खेळवण्याचा निर्णय घेतला.
पण, युरोपियन क्रिकेट सीरिज ( ईसीएस) टी 10 लीगमध्ये सध्या नवा प्रयोग केला जात आहे. सामना बरोबरीत सुटल्यानंतर येथे सुपर ओव्हरच्या जागी गोल्डन बॉलने निकाल लावला जात आहे. या लीगचा पाचवा सामना सीसाईड सीसी विरुद्ध जोंकोपींग सीए यांच्यातला सामना बरोबरीत सुटला. दोन्ही संघांनी निर्धारीत 10 षटकांत 90 धावा केल्या आणि त्यानंतर गोल्डन बॉलच्या नियमानुसार सीसाईट सीसी यांनी बाजी मारली. यापूर्वीही माद्रिद युनायटेड संघानं गोल्डन बॉल नियमानुसार लेवांटे सीसीवर विजय मिळवला होता.
काय आहे गोल्डन बॉल?
सामना बरोबरीत सुटल्यानंतर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला एक अतिरिक्त चेंडू टाकला जातो आणि त्यात त्यांना दोन किंवा त्याहून अधिक धावा करणं बंधनकारक आहे.
सामना बरोबरीत राहिल्यानंतर तीन मिनिटांच्या आत गोल्डन बॉल फेकायला हवा.
धावांचा पाठलाग करताना नाबाद राहिलेला फलंदाज हा गोल्डन बॉलचा सामना करू शकतो.
गोल्डन बॉलमध्येही निकाल न लागल्यास साखळी सामन्यातील कामगिरीवरून विजेता संघ निवडला जातो.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
दिग्गज खेळाडूच्या मुलाचा 'हॉट' अभिनेत्रीसोबत साखरपुडा; फोटो व्हायरल
... म्हणून शिखर धवनची पत्नी किक बॉक्सिंग शिकली; सत्य जाणून बसेल धक्का!
महेंद्रसिंग धोनीनंतर विराट कोहलीचा लॉकडाऊन लूक व्हायरल; डोळ्यांवर बसणार नाही विश्वास!
ENG v PAK : पाकिस्तानी क्रिकेटपटूंची राहण्यासाठी सोय फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नाही तर...
भारत-पाकिस्तान मालिका विचारातच घेत नाही, कारण...; पाकिस्तान क्रिकेट मंडळाचं वादग्रस्त विधान
IPL 2020 साठी आता बीसीसीआय ऑस्ट्रेलिया दौरा पुढे ढकलणार?
Web Title: Explaining the Golden Ball concept in ECS T10
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.