वीरेंद्र सेहवाग 'या' गोलंदाजाचा सामना करायला घाबरायचा

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मैदानावरील द्वंद्व हे जगजाहिर आहे. भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शोएब अख्तर यांच्यातील शाब्दिक चकमक पाहण्यासारखी असायची. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 11:12 AM2018-10-02T11:12:57+5:302018-10-02T11:38:36+5:30

whatsapp join usJoin us
Explosive batsman Virender Sehwag scared to face shoaib akhtar | वीरेंद्र सेहवाग 'या' गोलंदाजाचा सामना करायला घाबरायचा

वीरेंद्र सेहवाग 'या' गोलंदाजाचा सामना करायला घाबरायचा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मैदानावरील द्वंद्व हे जगजाहिर आहे. या दोन्ही देशांमध्ये जेव्हा मालिका होत होत्या, त्यावेळी दोन्ही संघांमधील ठसन पाहण्यासारखी असायची. त्यात भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शोएब अख्तर यांच्यातील शाब्दिक चकमक पाहण्यासारखी असायची. 

रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून प्रसिद्ध असलेला शोएब जेवढ्या ताकदीने चेंडू टाकायचा, सेहवाग त्याच वेगात तो सीमारेषेपलिकडे पाठवायचा. शोएबचा सामना करताना सेहवाग कधी तणावात दिसला नाही, परंतु प्रत्यक्षात त्याला शोएबच्या गोलंदाजीचा सामना करताना भीती वाटायची. 

भारताचा माजी सलामीवीर सेहवागने एका कार्यक्रमात हे मान्य केले. तो म्हणाला," आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत मला शोएब अख्तरचा सामना करायला सर्वात जास्त भीती वाटायची. तो कोणता चेंडू बाऊंसर टाकेल की यॉर्कर टाकेल याचा काहीच अंदाज बांधता येत नव्हता. अनेकदा तर त्याने टाकलेला चेंडू माझ्या हेल्मेटला आदळला आहे.''

त्याने पुढे असेही सांगितले की,'' शोएबचा सामना करायला भीती वाटत असली तरी त्याच्या गोलंदाजीवर चौकार मारणेही तितकेच आवडायचे.'' 

आफ्रिदी का घाबरायचा सेहवागला ?
या कार्यक्रमाला सेहवागसह पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीही उपस्थित होता. विस्फोटक फलंदाजीबरोबरच आपल्या फिरकीच्या तालावर तो प्रतिस्पर्धी खेळाडूंना नाचवायचा. मात्र, त्याला सेहवागला गोलंदाजी करताना भीती वाटायची. त्याला गोलंदाजी करणे नेहमी अवघडीचे असायचे, असे त्याने सांगितले. 
 

Web Title: Explosive batsman Virender Sehwag scared to face shoaib akhtar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.